भारतातील तरुण पिढी हृदय विकारांना का बळी पडत आहे?
By Dr. Santosh Dhage
इंडीयन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, भारतीयांमध्ये उद्भवणाऱ्या हृदयविकाराच्या झटका हा पन्नास टक्के लोकांना पन्नाशीच्या आतील लोकांमध्ये होतात. आणि एकूण हृदयविकारच्या धक्क्यांपैकी पंचवीस टक्के हे चाळीसहून कमी वय असलेल्या लोकांना होतात. खेड्यात रहाणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरांमधील लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता तिप्पटीने जास्त असते.
हृदयविकार हा प्रचंड ताणतणाव खाण्याच्या वाईट सवयी मद्य आणि धूम्रपान याच्या मुळे होतो
१. प्रचंड ताणतणाव – आजच्या जीवघेण्या स्पर्धात्नक जगात, तणाव प्रचंड वाढल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शारीरिक निष्क्रीयता याचेही प्रमाण वाढत जाते पण या तणावाला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी, दररोज कमीतकमी तीस मिनिटे तरी ध्यान आणि व्यायामासाठी तिला ते हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात.
२. खाण्याच्या वाईट सवयी –
तणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे वाढलेले तास यामुळे खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. लोक फक्त जंक फुडच खातात असे नाही – तर त्यांच्या खाण्याच्या वेळाही नियमित नसतात. परिणामी, शरीराला आवश्यक असे पोषण मिळत नाही आणि त्याऐवजी, त्यात हानिकारक चरबी आणि विषारी पदार्थ भरले जातात. त्यामुळे लठ्ठपणा येतो, भारतातील लठ्ठ व्यक्तींची संख्या २०१० मधील १७.३ टक्क्यांवरुन वाढून २०१४ मध्ये १९.५ टक्के झाली आहे.
३. मद्य आणि धूम्रपान – मद्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे ऱ्हीदम्स (ठोके?) अनियमित होतात ज्याला अऱ्हिदमियास म्हणतात. त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाणही वाढू शकते. त्याचबरोबर वाढीव कॅलरी सेवनही, हे वेगळे सांगायलाच नको. धूम्रपानामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती वाढते.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी तुम्हाला निकोटीन किंवा मद्य यांसारख्या हानिकारक कृत्रिम उत्तेजकांची गरज नाही. तुम्ही या गोष्टींची जागा पोषक अन्नाला देऊ शकता. यामुळे फक्त व्यायाम करण्याचीच क्षमता वाढते असे नाही तर तुमच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होता.
जर तुम्हाला वर उल्लेखलेल्या व्यसनांपासून मुक्ती हवी असेल, तर तुम्ही आयुर्वेदीक औषधांचे सेवन सुरु करु शकता. ही औषधे शंभर टक्के नैसर्गिक आहेत आणि त्यांचे कसलेही दुष्परिणाम नाहीत. “आरोग्य ही संपत्ती आहे” ही म्हण तंतोतंत खरी आहे. आयुष्यातील सर्व काही – तुमचे यश, कुटुंब, दीर्घायुष्य आणि इतर हे या महत्वाच्या घटकाचे परिणाम आहेत.
