योजनांचा सविस्तर अहवाल ८ दिवसात सादर करा – खा. अनिल शिरोळे
दि: १९ जून २०१८ :-
केंद्र सरकारच्या विविध योजना जसे कि जन धन, stand up इंडिया, मुद्रा योजना, जीवन ज्योती, अटल पेन्शन , सुरक्षा बिमा, ह्या योजनांची पुणे लोकसभा मतदार संघात प्रभावी अंमल बजावणी होण्यासंबंधी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी ह्या योजनांसाठीची लीड बॅंक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे GM यु वी म्हस्के ह्यांची भेट घेऊन ह्या योजनांच्या आत्ता पर्यंत झालेल्या अंमलबजावणी चा विस्तृत अहवाल येत्या ८ दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ह्या योजनांच्या अंमल बजावणीच्या आढाव्या संबंधी १८ एप्रिल २०१८ रोजी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी सर्व संबंधित बँक अधिकाऱ्यांची एक बैठक देखील घेतली होती. त्यात या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना संबंधी विस्तृत चर्चा झाली होती. त्याचाच पुढील टप्पा म्हणून शिरोळे ह्यांनी म्हस्के ह्यांची भेट घेऊन पुणे शहरातील विधान सभा मतदार संघ नुसार अंमलबजावणी संबंधी एक सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे बँकांमार्फत कार्यरत असणाऱ्या आधार केंद्रांचा सद्य स्थितीतील अहवाल देखील शिरोळे ह्यांनी मागितला आहे. हे सर्व अहवाल सादर झाल्यानंतर , पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्या साठी परत एकदा सर्व बँक अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेणार असल्याचे देखील शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर सांगितले.
