राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत शाहरुख शेखने विजेतेपद पटकाविले

Share this News:
पिंपरी, (प्रतिनीधी) –  श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम. धारीवाल फार्मसी महाविद्यालयामध्ये औषधनिर्मानशास्त्र पदविका महाविद्यालयांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत एम.सी.इ. इन्स्टिट्युटच्या शाहरुख शेखने विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या एकेरी स्पर्धेमधून अभिनव एज्युकेशनच्या   पुनम करकेने विजेतेपद मिळवले.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या स्पर्धेचे उद्‌घाटन इंडियन फार्मासुटिकल असोसिएशनचे प्रतिनीधी प्रा. पी.पी. हंबर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. के. एस. जैन, प्रा. आर.बी. चिंतामणी, महाविद्यालयाचे प्राचार्य एस.ए.फेगडे उपस्थित होते.
मुलांच्या एकेरी स्पर्धेमधुन एम.सी.इ. इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीच्या शाहरुख शेखने विजेतेपद पटकाविले. तर  भालचंद्र इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीच्या प्रणय गनवीर उपविजेता ठरला. मुलींच्या एकेरी स्पर्धेमधुन अभिनव एज्युकेशनच्यापुनम करकेने  विजेतेपद मिळविले. तर भारती विद्यापीठ इन्स्टिटयुट ऑफ फार्मसीची मेघाली विटकर उपविजेती ठरली.
तसेच मुलांच्या दुहेरी स्पर्धेमधुन अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या शंशाक बन्छोड व रोहन पाचपुते यांना विजेतेपद मिळाले. तर आर.जे. एस.पी. एम इन्स्टिटयुटचे सुरज जांभुळकर, संजय गायकवाड उपविजेता ठरले. मुलींच्या दुहेरी स्पर्धेमध्ये एम.सी. इन्स्टिटयुट ऑफ फार्मसीच्या शगुफा सलमानी व सुम्मया शेख यांना विजेतेपद मिळाले. तर भारती विद्यापीठच्या प्राची करवा व रेश्मा राठी उपविजेत्या ठरल्या.
या सपर्धेमध्ये मुलांच्या व मुलींच्या एकेरी व दुहेरीच्या एकूण ६९ स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये १६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे आयोजन संस्थेचे मानद सचिव अॅड. राजेंद्रकुमार मुथा व महाविद्यालयाचे प्राचार्य एम. ए. फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन संध्या सुद्रिक यांनी केले. एम. बी. गुंगेवार यांनी आभार मानले.  ज्योती चौधरी, एस.डी. रेडे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.