सारसबागेला क्लीन स्ट्रीट फूड हब चा दर्जा :-बापट

IMG-20180607-WA0017.jpg
Share this News:

पुणे ता. :-ग्राहकाला स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य शासनाने ” क्लीन स्ट्रीट फूड हब “ असा विशेष दर्जा दिला आहे. अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली.

जागतिक अन्न सुरक्षितता दिनानानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, आणि नागपूर फुटाळा तलाव येथील खाऊ गल्लीलाहीक्लीन स्ट्रीट फूड हबहा विशेष दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ,चविष्ट आणि अधिक दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील .अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि एफ एस एस आय चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर,अन्न व औषध प्रशासन सचिव संजय देशमुख,
गेनया संस्थेचे भारतातील प्रमुख तरूण वीज आणि ए एफ एस टी आय चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे व इतर वरिष्ठ अधिकारी, विविध अन्न खाद्यपदार्थ व्यावसायिक व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

दोन मोबाईल फूड टेस्टींग लॅबसाठी केंद्राकडून राज्याला १० कोटी निधी उपलब्ध झाला आहे. असे सांगून बापट पुढे म्हणाले की, स्वच्छता बाळगणाऱ्या उपहारगृहांना हायजीन रेटींग आणि फूड फोर्टीफीकेशन लवकरच दिले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळावेत यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यासाठी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन जन जनजागृती करण्याची एक मोहीम शासनाने आखली आहे. त्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत. अशा योजनांचे देशभरात अनुकरण केले जात आहे. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह आहे.

दूध, आटा, मैदा, मीठ, खाद्यतेल,इ.मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी,कॅल्शिअम, लोह,याचे फूड फोर्टिफिकेशन करण्याचे काम राज्याने उत्तम प्रकारे केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यांची माहिती आता online उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या नवीन संकेत स्थळाचे उदघाटन व online प्रणालीचे उदघाटन बापट यांच्या हस्ते झाले. तसेच पौष्टिक आहार उपक्रमातील पिंक बुक व येलो बुक याचे उदघाटनही बापट यांनी केले.

स्वच्छतेचे निकष पाळणाऱ्या राज्यातील ३० उपहारगृहांना बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील १० उपहारगृहांचा समावेश आहे

WordPress database error: [Error writing file '/tmp/MYfd=1382' (OS errno 28 - No space left on device)]
SELECT SQL_CALC_FOUND_ROWS wp_mt5p6xqhpd_posts.ID FROM wp_mt5p6xqhpd_posts LEFT JOIN wp_mt5p6xqhpd_term_relationships ON (wp_mt5p6xqhpd_posts.ID = wp_mt5p6xqhpd_term_relationships.object_id) WHERE 1=1 AND wp_mt5p6xqhpd_posts.ID NOT IN (23806) AND ( wp_mt5p6xqhpd_term_relationships.term_taxonomy_id IN (5) ) AND ((wp_mt5p6xqhpd_posts.post_type = 'post' AND (wp_mt5p6xqhpd_posts.post_status = 'publish'))) GROUP BY wp_mt5p6xqhpd_posts.ID ORDER BY wp_mt5p6xqhpd_posts.post_date DESC LIMIT 0, 3