सारसबागेला क्लीन स्ट्रीट फूड हब चा दर्जा :-बापट
पुणे ता. :-ग्राहकाला स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य शासनाने ” क्लीन स्ट्रीट फूड हब “ असा विशेष दर्जा दिला आहे. अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली.
जागतिक अन्न सुरक्षितता दिनानानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, आणि नागपूर फुटाळा तलाव येथील खाऊ गल्लीलाही ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ,चविष्ट आणि अधिक दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील .अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि ‘एफ एस एस आय’ चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर,अन्न व औषध प्रशासन सचिव संजय देशमुख,
‘गेन’या संस्थेचे भारतातील प्रमुख तरूण वीज आणि ए एफ एस टी आय’ चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे व इतर वरिष्ठ अधिकारी, विविध अन्न खाद्यपदार्थ व्यावसायिक व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
दोन मोबाईल फूड टेस्टींग लॅबसाठी केंद्राकडून राज्याला १० कोटी निधी उपलब्ध झाला आहे. असे सांगून बापट पुढे म्हणाले की, स्वच्छता बाळगणाऱ्या उपहारगृहांना हायजीन रेटींग आणि फूड फोर्टीफीकेशन लवकरच दिले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळावेत यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यासाठी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन जन जनजागृती करण्याची एक मोहीम शासनाने आखली आहे. त्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत. अशा योजनांचे देशभरात अनुकरण केले जात आहे. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह आहे.
दूध, आटा, मैदा, मीठ, खाद्यत
