सौभाग्य योजनेंतर्गत महावितरणची प्रभावीकामगिरी

Share this News:

मुंबई, दि. 19 जुलै, 2018 :-

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्ययोजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून आतापर्यन्त 47हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीजजोडणी देण्यात आलीआहे. मा. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी आज संवाद साधला. यावेळी मा.पंतप्रधानांनी 70 वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरीनकेबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदाकौतूक केले. अशा कामांचा देशाला अभिमान वाटतो असेही तेयावेळी म्हणाले. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

सौभाग्य योजनेत शहरी ग्रामीण भागात विद्युतीकरण झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येत असून यात आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकातील लाभार्थ्यांना नि:शुल्क तर इतर लाभार्थ्यांना नाममात्र500 रुपये शुल्क भरून वीजजोडणी देण्यात येत आहे. महाराष्ट्रातआतापर्यन्त 47 हजार लाभार्थ्यांना या योजनेत वीजजोडण्या देण्यातआलेल्या आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांना दि. 31 डिसेंबर 2018पर्यन्त वीजजोडणी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ग्रामीण शहरीभागातील वीजजोडणीपासून वंचित असणाऱ्या कुटुंबांना वीजजोडणीदेण्यासाठी 1,945 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादसाधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही उपस्थित होते. मा.पंतप्रधानांनी याप्रसंगी महावितरणने केलेल्या घरापुरी बेटाच्याविद्युतीकरण कामाचे विशेषत्वाने कौतुक केले. यापूर्वीही मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. 25 फेब्रुवारी 2018 च्या मन कीबात या कार्यक्रमात घारापुरी बेटाच्या उल्लेखनीय कामाचे कौतुककेले होते.