हे सरकार बळीराजाचे नाही तर कसायाचे – सुनील तटकरे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचा पहिला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. कर्जमाफीच्या अर्जात जर शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली तर शेतकऱ्यांवर फौजदारी करू असे म्हणणारे हे सरकार बळीराजाचे नसून कसायाचे सरकार आहे अशी टीका त्यांनी सरकारवर केली. चंद्रपूर येथे पक्षाच्या कार्यकारिणी मेळाव्याला संबोधित करत असताना ते बोलत होते.
यावेळी या मेळाव्याला माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदिप गड्डमवार, शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत देशकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अॅड. जयदेव गायकवाड, वक्ता प्रशिक्षण सेलचे प्रमुख प्रदिप सोळुंखे, आमदार प्रकाश गजभिये , माजी आमदार संदिप बाजोरीया, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
