पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ३१ डिसेंबर पार्ट्या व हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी

Share this News:

पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ३१ डिसेंबर पार्ट्या व हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे ग्राहक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश पवार यांनी पुणे निवासी उपजिल्हाअधिकारी राजेंद्र मुठे यांना दिले .

पुण्यात होणाऱ्या मद्यधुंद पार्ट्यामधून तरुण तरुणीचे होणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी आपल्या निवेदनात केली . हिंदू संस्कृतीला न पटणाऱ्या या गोष्टी आहेत वेळेतच या पार्ट्याना आळा घाला . यातून तरुण तरुणीचे अपघात घडतात व छेडछाडीचे प्रकार घडतात . कारण सर्रास अशा पार्ट्यामध्ये १८ वया खालील तरुण तरुणी दारू व हुक्क्याचे आहारी गेलेले दिसतात . अशाने तरुण पिढी चुकीच्या मार्गाने वळते व यातून राष्ट्राचे पण नुकसान होते . त्याकरिता अखिल भारतीय छावा संघटना जनहिताकरिता अशा ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांच्या निषेध करत आहे . अन्यथा या पार्ट्या बंद न झाल्यास छावा संघटना आपल्या स्टाईलने बंद करेल व याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील

यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे ग्राहक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश पवार , पश्चिम महाराष्ट्र ग्राहक आघाडी अध्यक्ष राजाभाऊ पवार , उपाध्यक्ष अनिल पाटील , पुणे पिंपरी चिंचवड अध्यक्ष गणेश जाधव , पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष शरद कुंभार , बिट्टू पांचाळ , गौतम ओव्हाळ , जितेंद्र बारगे , शैलेश कोळी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .