कोरठण खंडोबाच्या यात्रेत दुसर्‍या दिवशी चार लाख भाविकांच्यावर, भंडार्‍याच्या मुक्त उधळणात रंगला पालखी सोहळा

Share this News:

नगर  ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडारा व खोबर्‍या ची मुक्त उधळण करीत राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबाच्या यात्रेत दुसर्‍या दिवशी चार  लाख भाविकांच्यावर मांदियाळीत खंडोबाचा पालखी सोहळा रंगला.
पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत असून नगर जिल्हय़ातील यात्रौत्सवाला प्रथम याच यात्रेने प्रारंभ होत असल्याने यात्रेला विशेष महत्व आहे. सोमवारी पहाटेपासून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर  सकाळी चांदीच्या सिंहासनाचे व उत्सव मूर्तीचे अनावरण होऊन भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
आज दुसर्या दिवशीची पूजा पाहटे पारनेरच्या गटविकास अधिकारी राणी फराटे व मदन फराटे या दापत्याच्या  हस्ते महाभिषेक झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या . दिवसभर तळी भांडार व देवदर्शन चालू असताना सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ व ‘सदानंदांचा यळकोट, कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं’ या जय घोषाने खंडोबानगरी दुमदुमुन गेली होती.
पोलिस उपाधीक्षक आनंद भोईटे , तासिलदार भारती सागरे यांनी यात्रेची पाहणी केली , जिल्हा परिषदेचे मा उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे , मा आमदार सीताराम मामा घनदाट , प स सदस्य भास्कर शिरोळे यांनी देवदर्शन घेतले तर अनेक शेतकरी , भक्तांनी आपले बैल देव दर्शनाला आणले होते
पारनेर,शिरूर,जुन्नर आगाराने जादा ४०  बसेसची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली. यात्रेच्या नियोजनासाठी देवस्थानचे अध्यक्ष अँड.पांडुरंग गायकवाड यांच्यासह विश्‍वस्त,ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
रात्री पिंपळगावरोठा गावात मुक्कामी असलेली खंडोबाची पालखी व छबीना मिरवणुकीने सकाळी अकरा वाजता कोरठण खंडोबा मंदिराकडे येत असताना रस्ता गर्दीने फुलून गेला होता. शेकडो युवक व  खंडोबाची गीते म्हणणार्‍या महिलांमुळे वातावरण भक्तिमय बनले होते. देवस्थानचे अध्यक्ष अँड.पांडुरंग गायकवाड यांनी पालखी सोहळा मंदिराच्या पायरीनजीक आल्यावर पालखी मानकरी व उपस्थितांचा गौरव करण्यात आला.
पुणे,मुंबई,नाशिक,अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद आदि जिल्हातून आज भाविक आले होते