‘सावता परिषद’चे पुणे येथे अधिवेशन

Share this News:
पुणे, दि. 29 जानेवारी : माळी समाजाचे सक्रीय संघटन ‘सावता परिषदे’च्या वतीने सावता परिषदेचे तिसरे त्रैवार्षिक अधिवेशन आणि माळी समाजाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये आणि भा.ज.यु.मो. प्रदेशाध्यक्ष आमदार योगेशजी टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 31 जानेवारी रोजी पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून माळी समाजबांधंव मोठ्या संख्येने एकत्र येणार असल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिवेशन प्रसंगी पुण्याचे पालकमंत्री ना. गिरिष बापट यांच्यासह आ. सुरेश गोरे, आ. अतुल सावे, आ. भीमराव धोंडे, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. मनिषा चौधरी, माजी आ. कमलताई ढोले पाटील, पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर व चंचलाताई कोद्रे, श्री. शंकर बोरकर, सिंहगड इंस्टिट्यूटचे संस्थापक प्रा. मारुती नवले, श्री. रंजनभाऊ गिरमे हे निमंत्रीत मान्यवर आहेत. सावता महाराजांचे वंशज श्री. रमेश वसेकर व महात्मा फुलेंच्या वंशज सौ. निता होले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ, बेबीताई गायकवाड व एकनाथ हेगडे यांना यावेळी समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
ओ.बी.सी.साठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावे, बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे होत असलेली ओबीसीमधील घुसखोरी थांबवावी. देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्राची फेर चौकशी करुन कारवाई करावी, जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ सुरु करावी तसेच क्रिमीलेअर अट रद्द करावी, लोकसभा-विधानसभा मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव ठेवावेत, ओबीसी कर्मचा-यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण ठेवावे, ओबीसी महामंडळाला दरवर्षी 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी तसेच श्रीक्षेत्र अरणला ‘अ’ दर्जा देऊन विकासासाठी भरीव निधीची तरतूद करावी, फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावा व त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जार्चे स्मारक करावे आदि ठराव मंजूर करुन त्याचा मसूदा केंद्र व राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.