Devil Circuit: मुंबईकरांना ‘डेविल्स सर्किट’मध्ये धावण्याची संधी

Share this News:

मुंबई : भारतात प्रथमच सध्या धावण्याच्या सर्किट स्पर्धेने जोर धरला आहे. टेनिस, बॅडमिंटन आणि क्रिकेटच्या धर्तीवर होत असलेल्या या सर्किट प्रकाराच्या माध्यमातून भारतीयांना अ‍ॅथलेटिक्सच्या रूपाने तंदुरुस्त ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्य आयोजक वोलॅनो संस्थेच्या अदनान अदीब यांनी सांगितले.

डेविल्स सर्किट या नावाने सुरू असलेली ही सर्किट आतापर्यंत भारतातील चार मुख्य शहरांमध्ये पार पडली असून, आता मुंबईकरांना या सर्किटचा अनुभव घेण्याची नामी संधी मिळणार आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात सुरुवात झालेल्या या सर्किटचा आतापर्यंत २० हजारांहून अधिक धावपटूंनी अनुभव घेतला असून, आता २१ फेब्रुवारीला पनवेल येथील हिरानंदानी फॉर्च्युन सिटी येथे सकाळी ७ वाजता मुंबईतील सत्राचे आयोजन होईल.

क्रीडा संस्कृती रुजवून तंदुरुस्ती वाढवण्याचा मुख्य उद्देश घेऊन या सर्किटचे आयोजन करण्यात आल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे पुढील ३६ महिन्यांत या अनोख्या स्पर्धेच्या तब्बल २४ सत्रांचे देशभरातील मुख्य शहरांमध्ये आयोजन करण्याचे लक्ष्य टीम ‘डेविल्स सर्किट’ने ठेवले आहे.