रेल्वे बजेट म्हणजे जुन्याच कढीला उत ; फक्त वाय फाय असलेले  बजेट -ना. धनंजय मुंडे

Share this News:

बीड दि 25 – मागील 2 -3 वर्षांचे अन यावर्षीचे बजेट पाहता यात नवीन काहीच नाही: हे बजेट म्हणजे जुन्याच कढीला ऊत असून फक्त वाय फाय देणारे  बजेट असल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

     फक्त प्रस्ताव व प्रयत्न करणार याशिवाय दुसरी एकही मोठी घोषणा बजेट नाही. राज्याचे रेल्वे मंत्री असल्याने महाराष्ट्राला मोठ्या आशा होत्या मात्र  राज्याला दिलासा देणारी एक ही मोठी बाब अर्थसंकल्पात नाही, किमान काही नवीन रेल्वे तरी सुरु करायला हव्या होत्या तेही यात नाही, एकंदरीत जनतेची निराशा करणाराच हा अर्थसंकल्प असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.