जागतिक हॅम रेडिओ दिवस 18 एप्रिल

Share this News:
दरवर्षी जागतिक हॅम रेडिओ दिवस 18 एप्रिलला पुण्यात व जगभर साजरा केला जातो. या वर्षीही तो पुण्यात भव्यतेने इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिर्स येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळात साजरा करण्याचे ठरले आहे.

या कार्यक्रमाला  डॉ प्रमोद काळे, माजी संचालक ,  भारतीय अंतराळ संशोधन संस्था,  यांचे भारताचे दळणवळण उपग्रह काल आज व उद्या या विषयावर उद्बोधक व शास्त्रीय मुख्य भाषण होईल.

हॅम रेडिओ हा एक जागतीक व शास्त्रीय छंद आहे . जगातील लाखो लोक दररोज एकमेकांच्या संपर्कात हॅम रॅडिओद्वारे असतात व निरनिराळ्या प्रकल्पांची व प्रयोगांच्या माहितीची देवाण घेवाण करतात.

या छंदात जगभर चिमुरड्या मुला पासून ते आजोबांपर्यंत सर्व वयाचे स्त्री पुरुष सहभागी असतात. या छंदामुळे कौशल्य विकासा बरोबर सखोल शास्त्रीय ज्ञान प्राप्त होण्यास मदत  होते. भारतात या छंदाचा प्रसार सर्व स्तरात झपाट्याने होत आहे.

हा छंद करणाऱ्याला” हॅम”असे जगभर संबोधले जाते

हॅम ची संख्या  जितकी जास्त तितकी त्या देशाची तंत्रज्ञानात प्रगती  जास्त अशी फुटपट्टी जगभर  लावली जाते. दिनांक १८ एप्रिल रोजी होणाऱ्या तीन तासाच्या कार्याक्रमात  हॅम रेडिओची माहिती, चित्रफिती  व  हॅम रेडिओचे प्रात्यक्षिकं याचा समावेश आहे. तसेच या वर्षी पुण्याच्या VU2COE, इंजिनीअरिंग महाविद्यालयातील, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या” स्वयम “या छोट्या उपग्रहाचे सादरीकरण विद्यार्थी करतील

हा उपग्रह मे १६ च्या शेवटच्या आठवड्यात इसरो तर्फे अवकाशात पाठविला जाणार आहे. हीं पुणेकरांना दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

मेक इन इंडिया व कौशल्य विकास अंतर्गत शाळाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागावर या कार्यक्रमात भर दिला जाईल. प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयात हॅम रेडिओ क्लब व 24 तास सुरु असणारी प्रयोगशाळा सुरु करण्यावर मार्गदर्शन केले जाईल. CBSE चा अभ्यासक्रम असलेल्या ९ वि च्या शालाल्न्च्या अभ्यासक्रमात  हॅम रेडिओ चा समावेश केला आहे

हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिर्स आणि मराठी  विज्ञान  परिषदे तर्फे  केला जात असून,  विज्ञान भारती या संस्थेचे सहकार्य लाभणार आहे तर अजिंक्य  डी वाय पाटील विद्यापीठ हॅम क्लब VU2DYP मुख्य पुरस्कर्ते आहेत