शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन

शिक्षण मंडळ,पुणे महानगरपालिका आणि व्यक्तिमत्व विकास प्रबोधिनीच्या वतीने शिक्षण मंडळ संचालित शाळांमधील इयत्ता ५ वी व ६ वी तील विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वारजे कर्वेनगर भागातील विद्यार्थ्यांसाठी अश्या प्रकारच्या शिबिराचे उद्घाटन आज सम्राट अशोक विद्यालयात करण्यात आले .या वेळी या शिबिरात मुलांना विविध उपक्रम शिकविणार्या व्यक्तिमत्व विकास प्रबोधिनीच्या तनुजा खेर,शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर,श्री प्रदीप तथा बाबा धुमाळ,पर्यवेक्षिका सौ.रहिंज,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जाधव व सौ कर्हाळे उपस्थित होत्या. दि १८ एप्रिल ते दि १४ मी या कालावधीसाठी चालणार्या या शिबिरात सुमारे १२५ मुले सहभागी झाली आहेत.या वेळी बोलताना सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की वस्ती विभागातील मुलांना ही नवनवीन शिकण्याची हौस असते मात्र महागडी उन्हाळी शिबिरे त्यांना परवडत नाही,अश्या विद्यार्थ्यांसाठी मनपा शिक्षण मंडळाने अशी व्यक्तिमत्व विकास शिबिरे आयोजित केली असून यात मुलांना सुर्यनमस्कार ,प्रार्थना,ओंकार,समूहगान,कथा