महावितरण 15 डिसेंबरपर्यन्त वीजबिलासाठी 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार
मुंबई, दि. 25 नोव्हेंबर 2016 : राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार महावितरण वीजबिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर2016 पर्यन्त घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे.
ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रक्कमेचे राहील तेवढ्या रक्कमेच्या जुन्या पाचशेच्या नोटामहावितरण स्वीकारणार आहे. मात्र वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात (ऍ़डव्हान्स पेमेंट) रक्कमस्वीकारण्यात येणार नाही. याशिवाय वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठीमहावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व मोबाईल ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे.वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
