एव्हिएशन सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची गोएअर कडून सुरवात
पुणे, 22 जून 2017: भारताची वेगाने वाढणारी एअरलाईन गोएअरने आज ‘एव्हिएशन सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एएसटीआय) च्या स्थापनेची घोषणा केली आहे ज्याला ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) ची मान्यता मिळाली आहे. गोएअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉल्फगॅंग प्रॉक-शोर यांच्या हस्ते सदर प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
गोएअरची एव्हिएशन सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्या सुरक्षा कर्मचारी, कॉकपिटमध्ये आणि केबिन क्र्यू मधील कर्मचारी किंवा ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी ब्युरो ऑफ इंडिया (बीसीएएस) ने निर्धारित केलेल्या विमानतळावरील संरक्षित ठिकाणांच्या संदर्भात असलेल्या सर्व भागधारकांना संरक्षण विषयक प्रशिक्षण देणार आहे. या संस्थेला इतर एअरलाईन्सला नियामक मार्गदर्शक तत्वांना अनुसरून असलेल्या गरजांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याची परवानगी आणि सज्जता आहे.
गोएअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉल्फगॅंग प्रॉक या प्रसंगी असे म्हणाले की “द एव्हिएशन सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये एव्हिएशन सुरक्षेबाबत क्लासरूम्स आणि इ-लर्निंग ट्रेनिंग कोर्सेस समाविष्ट आहेत ज्यात सुरक्षा आणि सुलभीकरण या सहीत विविध मुद्यांचा अंतर्भाव आहे. या संस्थेत ब्युरो ऑफ एव्हिएशन सिक्युरिटी ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे ज्याद्वारे सुरक्षा विषयक मनुष्यबळ आणि इतर मनुष्यबळ यांना एव्हिएशन सुरक्षेच्या प्रत्येक क्षेत्राच्या तांत्रिक माहितीबाबत मार्गदर्शन केले जाईल.”
संस्थेत दृषकाव्य सादरीकरणासाठी एलसीडी प्रोजेक्टर्सने सज्ज चार अत्याधुनिक ट्रेनिंग रूम्स आहेत; एक संगणकावर आधारित (सीबीटी) 16 संगणक असलेली खोली; विविध स्विचेस सहित आयइडी (इम्प्रोव्हाइजड एक्सप्लोसिव्ह डिव्हायसेस) डेमो रूम. इथे डीएफएमडी (डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर) आणि एचएचएमडी (हँड हेल्ड मेटल डिटेक्टर) ही उपलब्ध आहेत. इथे उपलब्ध कोर्सेस मध्ये एअर क्र्यू इनिशियल कोर्स (6 दिवस), एअर क्र्यू रिफ्रेशर कोर्स (2 दिवस), सुरक्षा कर्मचार्यांसाठी एव्हीएसइसी इंडक्शन कोर्स (5 दिवस), सुरक्षा कर्मचार्यांसाठी बेसिक एव्हीएसइसी कोर्स (12 दिवस),सुरक्षा कर्मचार्यांसाठी एव्हीएसइसी रिफ्रेशर कोर्स (03 दिवस), एअरपोर्ट स्टाफ साठी एव्हीएसइसी अवेअरनेस कोर्स(01 दिवस) इ. समावेश आहे.
