महात्मा फुले पुण्यतिथी मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान
पुणे प्रतिनिधी / महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त आज दि 26 नोव्हें 2017 रोजी सकाळी श्री काळभैरवनाथ मंदीर, हिंगणे मळा, हड़पसर येथे मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
प्रसंगी दंत तपासणी नेत्र तपासणी मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया ब्लड प्रेशर तपासणी, सांधे, मणका गुडघेदुखी तपासणी व व्यायामोपचार शासकीय योजना (वैद्यकीय) जनजागृती अभियाना इ सुविधा देण्यात आल्या.
फिजीयोथेरेपिस्ट डॉ ज्ञानोबा मुंडे डॉ मानसी पवार यांनी रूग्णांची तपासणी करुण व्यायामोपचार केले तसेच डेंटिस्ट डॉ खजिता मेमन व टीम ने दातांची तपासणी केली डॉ विशाखा प्रांजळे डॉ आश्विनी यानी जनरल तपासणी केली श्री किरण नाईक यांनी नेत्र तपासणी केली लहान मुलांची ब्लड ग्रुप तपासणी केली,
अनुलोम हड़पसर भाग जनसेवक श्री गणेश काळे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली तसेच गरजु पर्यंत माहिती पोहोचवण्याचे आवाहन केले प्रकृती केअर फाउंडेशन च्या सौ शिवकण्या बारगजे श्री बालासाहेब माने श्री मनोज मोहिते व्ही केअर फार्मा चे नितिन पाटे काळ भैरवनाथ जीर्णोद्धार समिती चे श्री गणेश हिंगणे व इतर सर्व कार्यकर्ते यांनी या उपक्रमाचे उत्तम नियोजन केले तसेच अनुलोम लोकनेते गोपीनाथराव मुंडे मेमोरियल हेल्थ केअर सेंटर, रंगूनवाला डेंटल कॉलेज, व्ही केअर फार्मा व काळ भैरवनाथ जीर्णोद्धार समिती यांच्या सहकार्यातुन हा उपक्रम राबवण्यात आला, 150 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून 10 गरजुंची मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, श्री गणेश हिंगणे यांनी आभार व्यक्त केले.
