वायू प्रदुषणाचे लहान मुलांवरील परिणाम म्हणजे आयुष्यभरासाठीची समस्या
मुंबई, १3 डिसेंबर २०१७ – लहान मुलांवर हवेतील प्रदुषणाचा फारच लवकर परिणाम झाल्याचे दिसून येत असून ही त्यांच्या आरोग्यासाठीची दीर्घकालीन समस्या बनू शकते. अनेक अभ्यासांती असे लक्षात आले आहे की, न्यूमोनिया, दमा, अस्थमा आदी श्वसनविकारांशी हवेच्या प्रदुषणाचा फार निकटचा संबंध असतो. त्याचा मुलांच्या प्रतिकार शक्तीवरही विपरित परिणाम होत असून मेंदू, फुफ्फुसे आणि बौद्धिक विकासावरही हवा प्रदुषण नकारात्मक परिणा घडवून आणते. जर योग्य वेळी योग्य ते उपचार घेतले गेले नाहीत, तर हवेच्या प्रदुषणाचे परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात.
यापूर्वी झालेल्या अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, हवा प्रदुषणाचा लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या व मेंदूच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. श्वासावाटे किती हवा शरिरात ओढली जाते हे शारीरिक हालचालींवरही बरेचसे अवलंबून असते. मैदानी खेळ खेळणारी मुले बसलेल्या मुलांपेक्षा अधिक हवा श्वसन करतात. मुलांमधील श्वसन प्रमाणाच्या या फरकामुळेही त्यांना असलेला प्रदुषणकारी घटकांचा धोका कमी- अधिक प्रमाणात वाढू शकतो. स्वच्छ हवेमध्ये मुलांच्या मेंदू व फुफ्फुसांची वाढ झपाट्याने व व्यवस्थित होते.
मुलांवर हवा प्रदुषणाचे होणारे परिणाम याविषयी बोलताना ब्लूएअरच्या पश्चिम व दक्षिण आशिया विभागाचे संचालक श्री. गिरीश बापट म्हणाले, “प्रौढांपेक्षा लहान मुलांवर हवेतील प्रदुषणाचा फार लवकर परिणाम होतो. त्यांची फुफ्फुसे व प्रतिकार शक्ती विकसित होण्याच्या मार्गावर असल्यामुळे हवेतील प्रदुषित घटक त्यांच्या शरिरात श्वसनावाटे अधिक प्रमाणात जाऊ शकतात. काही मुलांमध्ये याचे प्रमाण फारच जास्त असते. दीर्घकालीन फुफ्फुसरोग किंवा अस्थमा असलेल्या लोकांना तर अशा परिस्थितीत मोठा धोका उद्भवतो. हवेच्या प्रदुषणापासून स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेतानाच दर्जेदार एअर प्युरिफायर्सचा वापर करणे अत्यावश्यक असते. ब्लूएअरच्या आयओटीयुक्त एअर प्युरिफायर्सच्या मदतीने, कार्यालयात काम करतानाही आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने घरातील हवेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता पालकांमध्ये येत असून आपल्या मुलांना हवेच्या प्रदुषणापासून सुरक्षित ठेवता येते.“
मणियार क्लिनीकचे संचालक व नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. तुषार मणियार म्हणाले, “लहान मुलांमधील अस्थमा किंवा अन्य श्वसनविकार होण्यामागे अंतर्गत व बाह्य वातावरणातील हवा प्रदुषणाची भूमिका फार महत्वाची ठरते. बाह्य वातावरणातील हवेच्या प्रदुषणावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नसलो, तरीही मुलांना योग्य वेळेत घरी बोलावून बाहेरील हवा प्रदुषणापासून त्यांचे रक्षण करता येते. अंतर्गत हवा प्रदुषण टाळण्यासाठी धूम्रपान टाळले पाहिजे. जुने कार्पेट, लोकरीची खेळणी आदी स्वच्छ ठेवल्यास खोलीतील हवाही स्वच्छ राहू शकते. लहान मुले झोपण्यापूर्वी त्यांच्या खोलीतील हाव हेपा
(हाय एफिशिएन्सी एअऱ फिल्टर्स) तंत्रज्ञानाच्या एअऱ प्युरिफायर्सच्या मदतीने स्वच्छ करू घेणे आवश्यक असते. खोलीतील एअऱ क्लिनर्स दर वर्षी बदलणे आवश्यक असून असे केल्यास ते परिणामकारक कामगिरी दाखवू शकतात.“
पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५ हे प्रमाण आरोग्यावर गंभीर परिणाम करते. त्यामुळे, अस्थमा, दमा, दीर्घकालीन श्वसनविकार, श्वासोच्छावासाचे विकार, श्वास घेताना वेदना होणे, अकाली मृत्यू तसेच, फुफ्फुसाचे रोग आदी समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतात.
