दि. 6 व 7 ला महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा

Share this News:

पुणे, दि. 05 : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेला शनिवारी (दि. 6) सदाशिव पेठेतील भरत नाट्यमंदिरात सुरवात होत आहे. रविवारी (दि. 7) या स्पर्धेचा समारोप होणार असून पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडल या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

शनिवारी (दि. 6) सकाळी 10.45 वाजता नाट्यस्पर्धेचे उद्‌घाटन पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्याहस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे (पुणे परिमंडल), श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती), श्री. किशोर परदेशी (कोल्हापूर) उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर 11 वाजता पुणे परिमंडलाचे ‘मेकअप 1986’ तर सायंकाळी 5 वाजता बारामती परिमंडलाचे ‘गाभारा’ ही नाट्यकृती सादर होईल. रविवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता कोल्हापूर परिमंडलाचे ‘ओय लेले’ हे नाटक सादर होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. या तिनही नाट्यकृती पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.