ख्रिसमस व नववर्षानिमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने अनाथ , मतिमंद , अंध , अपंग , कॅन्सर , एच. आय. व्ही. ग्रस्त , रेड लाईट एरियामधील ७०० मुलांनी ” टायगर जिंदा है ” चित्रपटाचा लुटला आनंद
ख्रिसमस व नववर्षानिमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने अनाथ , मतिमंद , अंध , अपंग , कॅन्सर , एच. आय. व्ही. ग्रस्त , रेड लाईट एरियामधील ७०० मुलांनी ” टायगर जिंदा है ” या चित्रपटाचा आनंद लुटला . मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये अभिनेता सलमान खान याचा अभिनय असलेला ” टायगर जिंदा है ” या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते . हा चित्रपट दोन मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आला . या कार्यक्रमांस पोलीस अधिकारी विनोद सातव , शैलेश जगताप, श्री व सौ. भिंगारदिवे , नगरसेविका नंदा लोणकर , राजवीरसिंग घई , अरविंद बुधानी , माजी नगरसेवक बाबू वागसकर , चरणजितसिंग सहानी , भोलासिंग अरोरा , अजितसिंग राजपाल , गुरविंदरसिंग राजपाल , डॉ. अबू बुकार शेख , इंदरदीप कौर , सुचेन्द्रा चौधरी , पोलिस अधिकारी वैशाली चांदगुडे , परवेझ जमादार ,विद्यालता चव्हाण , ऍड. वसिम शेख , यासिन शेख आदी मान्यवर व विविध क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर व अंकुर कटियाल यांनी मनजितसिंग विरदी यांचे स्मृतिचिन्ह देउन स्वागत केले .
या चित्रपटाचे आयोजन मनजितसिंग विरदी , मनप्रित विरदी , मनमित विरदी , रिद्दीमा विरदी , हरभजनकौर विरदी , सहेर विरदी, करणसिंग गिल आदींनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी मुलांना पॉपकॉर्न , वेफर्स , सँडविच , चॉकलेट्स , बिशलेरी , पाण्याच्या बॉटल्स , आणि गुलाबपुष्प देउन मनजितसिंग विरदी यांनी मुलांचे स्वागत केले . अभिनेता सलमान खान यांचा अभिनय मुलांना आवडतो , त्यामुळे मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने या मुलांना या चित्रपटाचे खास शोचे आयोजन केले होते . गेली वीस वर्षापासून मनजितसिंग विरदी फाऊंडेशन विशेष मुलासाठी चित्रपटाचे यंदा ख्रिसमस व नववर्षानिमित्त फाऊंडेशनने ” टायगर जिंदा है ” या चित्रपटाचे आयोजन केले .
अक्षरपाऊल , महावीर निवासी मतिमंद , सेंट मार्गारेट , , संतुलन , झेप , केअर इंडिया , अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट , स्वरूपवर्धिनी , सेवाधाम मतिमंद निवासी , एथेल गॉर्डन , महावीर निवासी मूकबधिर , आधार , सिप्ला एज फाऊंडेशन , तैय्यबिया अनाथ आश्रम, टी. ओ. आय , शिलार व रेड लाईट एरियामधील मुलांनी या चित्रपटाचा आनंद लुटला .
या चित्रपटाच्या माध्यमातून मुलांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देउन त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला , मुलांनी आपले जीवन हे टायगरसारखे जगले पाहिजे . मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हेच मनजितसिंग विरदी फाऊंडेशनचे ध्येय आहे , असे मनजितसिंग विरदी यांनी सांगितले.
