कोथरूड शिवजयंती महोत्सवास उद्या पासून प्रारंभ – नाटक लावणीसह सामाजिक बांधिलकीची जपणूक ही
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवास उद्या १७ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार असून उद्या उदघाटनाच्या सत्रात रात्रौ ९ वाजता ” आया सावंत झूम के ” ह्या दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार असल्याचे संयोजक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अद्यक्ष संदीप खर्डेकर व कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके यांनी सांगितले,यावेळी उत्सव प्रमुख मंदार बलकवडे व उमेश भेलके उपस्थित होते.
दिनांक १८ रोजी दुपारी १२ वाजता फक्त महिलांसाठी ‘ तुमच्यासाठी काय पण ” हा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे .हे सर्व कार्यक्रम कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असून प्रवेश मोफत आहे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत.दिनांक १९ रोजी शिवजयंती निमित्त सकाळी ८ वाजता कोथरूड च्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मानवंदना दिली जाईल.
मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच मंगळवार २० फे रोजी एस एन डी टी कन्याशाळेतील दुपारी ३ वाजता २५ मुलींना मोफत गणवेश वाटप केले जाणार असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहुल बग्गा यांच्या हस्ते ही भेट दिली जाईल असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व विशाल भेलके यांनी सांगितले.तसेच शिवजयंती महोत्सवाचा भाग म्हणून कोथरूड पोलीस स्टेशन ला झेरॉक्स मशीन भेट दिली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
