कॅरेरा 2018 च्या #DRIVEYOURSTORY  जाहिरात मोहिमेला रणवीर सिंगची साथ

Share this News:

कॅरेरा या जागतिक लाईफस्टाईल ब्रॅण्डने रणवीर सिंग या आपल्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरसह #DRIVEYOURSTORY नव्या 2018 च्या मोहिमेचे सादरीकरण केले आहे.

हे कॅरेराच्या #DRIVEYOURSTORY मोहिमेचे महत्वाचे घटक आहेत. या घटकांच्या माध्यमातून ब्रॅण्डच्या स्पिरीटचे परफेक्ट प्रतिनिधीत्व केले जात असून यातून आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ साधणारे नॅरेटिव्ह तयार होते. या जाहिरात मोहिमेत रणवीर सिंग याने नवीन सिग्नेचर कलेक्शन वापरले असून यात इटालियन डिझाईन, हलके मटेरिअल आणि शहरी दृष्टिकोनासाठी कलात्मक रचना वापरण्यात आली आहे. फिटनेस आणि स्टाईलचा सुंदर मिलाफ साधलेल्या या नवीन स्टाईल्समुळे गर्दीच्या ठिकाणी तुमचे अस्तित्व नक्कीच वेगळे दिसू शकेल.

कॅरेराच्या #DRIVEYOURSTORY या नव्या मोहिमेबाबत बोलताना आयएमईए आणि एपीएसी (साफिलो समुह) चे व्यवस्थापकीय संचालक क्यारियाकोस कोफिनास म्हणाले, ‘‘रणवीर सिंगशी गेले वर्षभर आमची सशक्त भागीदारी सुरू असून त्याने आमच्या ब्रॅण्डमध्ये त्याचे खास रंग भरले आहेत. रणवीर सिंगसह या वर्षाची सुरुवात नव्या सिग्नेचर कलेक्शनने करताना आम्हाला आनंद होतो आहे. आजच्या तरुणाईच्या मनात घर करणार्‍या कल्पक मोहिमा आणि कलेक्शन तयार करणे हा सातत्यपूर्ण ध्यास आहे.’’

रणवीर सिंग म्हणाला, ‘‘नवीन सिग्नेचर कलेक्शनमुळे ब्रॅण्डच्या कारागिरीवर शिक्कामोर्तब होत असून याच्या आजवरच्या 60 वर्षांच्या इतिहासात बोल्ड स्टाईलचे कौतुक अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी केले आहे. त्यांच्या अत्याधुनिक #DRIVEYOURSTORY या मोहिमेचा भाग झाल्याबद्दल मला आनंद होत असून त्यासाठी खूप कष्ट घेण्याची माझी तयारी आहे. ते कष्ट असोत वा यश… त्यातून व्यक्तीचे खास व्यक्तिमत्वच समोर येते. तुम्ही या मोहिमेत माझी स्वतःची गोष्ट पाहू शकाल.’’

नुकत्याच सादर झालेल्या स्प्रिंग समर मोहिमेत रणवीर सिंगने कॅरेराचे 166/S, 167/S हे गॉगल्स आणि 169/V आणि 156/V या फ्रेम्स वापरल्या आहेत.