वीजबिलावरील पत्त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणची विशेषमोहीम ग्राहकांना मोबाईलवरील एसएमएसद्वारे पत्त्याची दुरुस्ती करतायेणार

Share this News:

मुंबई, दि. 20 मार्च 2018 : महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या वतीने राज्यभरातीलग्राहकांच्या सुविधेसाठी सातत्याने नवनवीन उपाययोजना करण्यातयेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणच्या वीजबिलावरीलग्राहकाच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या वतीनेअधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यातयेत असून त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणारआहे. मागील दोन दिवसात राज्यातील सुमारे 52 हजार ग्राहकांनी यासुविधेचा लाभ घेतला असून इतरांनीही याचा लाभ घ्यावा, असेआवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या ज्या ग्राहकांनी आपला अधिकृत मोबाईल क्रमांकमहावितरणकडे नोंदविला आहे. अशा ग्राहकांना महावितरणच्यावतीने एसएमएस पाठविण्यात येत आहे. या एसएमएस वरील लिंकओपन केल्यास त्यावर ग्राहकाचा पत्ता उपलब्ध असणार आहे. त्यापत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा सदर लिंकद्वारे ग्राहकांना देण्यातआली आहे. यात ग्राहकांना कुठलाही आर्थिक भार सोसावा लागणारनाही.

वीजबिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत बिलमिळणे, योग्य वेळेत रिडिंग करणे या प्रक्रियेत अधिक अचूकता येणारआहे. त्यामुळे ग्राहकांनाही वेळेत वीजबिल भरुन महावितरणच्यासवलतीचा लाभ घेता येणार आहे. राज्यात महावितरणचे सुमारे 2कोटी 50 लाखापेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी 1 कोटी 95लाख ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईलची नोंदणीमहावितरणकडे केली आहे. मोबाईलवरील एसएमएसच्या माध्यमातूनग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळेजास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाचीनोंदणी महावितरणकडे करावी असेही आवाहन महावितरणने केलेआहे.