महावितरण राज्यभरातील कार्यालयांतवृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणार
राज्य शासनाच्या उपक्रमानुसार महावितरणराज्यभरातील आपल्या सर्व कार्यालयांतवृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवित असून सर्वकार्यालयांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही देण्यात आलेआहे. महावितरणच्या सर्वच कार्यालयांतवृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवितांना लागवडकेलेल्या रोपांची निगा राखावी, असे आवाहनमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकश्री. संजीव कुमार यांनी केले आहे.
वृक्षारोपण लागवडीबाबत महावितरणचे अध्यक्षव व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमारयांनी वृक्षलागवडीने वातावरण प्रसन्न होऊनजगण्यात जीवंतपणा व उत्साह येतो. त्यामुळेसर्वांनी आपले वैयक्तिक योगदान देऊन सर्वकार्यालयांत वृक्षांची लागवड करावी व ठरवून दिलेलेउद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन केले आहे.
वृक्ष लागवड सप्ताहात सर्वाधिक रोपांचीलागवड करून जपवणूक करणाऱ्या कार्यालयांचागौरव करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीचाशुभारंभ महावितरणचे मुख्यालय असलेल्याप्रकाशगडमधील प्रांगणात संचालक सर्वश्रीदिनेशचंद्र साबू, सतीश चव्हाण व इतरअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.
