अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद

IMG-20180723-WA0011.jpg
Share this News:

पिंपरी, पुणे (दि. 23 जुलै 2018) लोकनेते शरद पवार यांनी ज्या प्रमाणे भारतीय क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार केली. त्याचप्रमाणे आगामी काळात भारतीय हॉकीला देखील पुर्व वैभव मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करील. कब्बडी, कुस्तीसह इतर सर्वच क्रिडा प्रकारातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील असतात. त्यांच्या वाढदिवसाला राज्यभर अनेक क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. त्यापैकी पिंपरीतील ‘अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी’ स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माझ्या हस्ते होत आहे. हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम येथे ‘अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा ’ बक्षिस वितरण समारंभ धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी (22 जुलै) संपन्न झाला. यावेळी माजी खासदार रणजीतसिंग मोहीते पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, रोहीत पवार, स्पर्धेचे संयोजक पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक राजु मिसाळ, शहर प्रवक्ते फझल शेख, फिरोज शेख आदी उपस्थित होते.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाने क्रिडा प्रबोधिनी संघाचा ४-१ असा सहज पराभव करून

स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हर्ष परमार याने २१ व्या मिनिटाला गोल करून एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाचे खाते उघडले. युवराज वाल्मिकी याने पुढच्या चारच मिनिटांनी गोल करून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ३९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करून वाल्मिकीने संघाची ३-० अशी आघाडी वाढवली. वाल्मिकीने गोलांची हॅट्रीक करून संघाला ४-१ असा विजय मिळवून दिला. क्रिडा प्रबोधिनी संघाकडून रैस मयुवर याने एक गोल केला.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः एक्सलन्सी अ‍ॅकॅडमीः ४ (हर्ष परमार २१ मि., युविराज वाल्मिकी २५, ३९, ५७ मि.) वि.वि. क्रिडा प्रबोधिनीः १ (रैस मयुवर ३५ मि.); हाफ टाईम २-०;

वैयक्तिक पारितोषिकेः

मालिकेचा खेळाडूः युवराज वाल्मिकी (एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी); सर्वोत्कृष्ट रक्षकः रूबेन केदारी (एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी); सर्वोत्कृष्ट फॉवर्डः अंनिकेत गुरव (क्रिडा प्रबोधिनी); सर्वोत्कृष्ट हाफः आशितोष लिंगे (आयकर विभाग संघ); सर्वोत्कृष्ट गोलरक्षकः जीवन शिंदे (क्रिडा प्रबोधिनी); शिस्तशीर खेळाडूः तालिब शहा (क्रिडा प्रबोधिनी)

——-