ABVP protest at Pune University against paper leak

Share this News:


      आज दिनांक २५ मे २०१७ रोजी अभाविपतर्फे अभियांत्रिकी परीक्षांच्या झालेल्या पेपरफुटी विषयी तीव्र आंदोलन करण्यात आले या वेळी अभाविप तर्फे निष्क्रिय परीक्षा विभागाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा परीक्षा नियंत्रक कार्यालय ते कुलगुरू कार्यालयकाढण्यात आली व कुलगुरू कार्यालयाबाहेर या प्रतीकात्मक तिरडी चे दहन करण्यात आले. 

      अभियांत्रिकी परीक्षांच्या Power System, Network Analysis (Electrical Branch) Air Polution and control, QACP (Civil Branch) Mechanics, Mathematics – 2, Mathematics – 3, Turbo Machine, Mechanical System Design, Industrial Engineering (Mechanical Branch) या विषयांच्या प्रश्नपत्रीका परीक्षेपूर्वीच एक तास फुटल्याचे अनेक प्रकार या वेळेसघडलेया फुटलेल्या प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणावर पैसे घेवून विकण्यात आल्या तसेच whatsapp च्या माध्यमातून या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहचल्या. विद्यापीठात अशा प्रकारे प्रश्नपत्रीका फुटण्याचा हा काही पहिला प्रकार नाहीया प्रश्नपत्रीका फुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे याच्या निशेदार्थ आज अभाविप तर्फे आंदोलन करण्यात आले.

      या वेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अभाविप च्या शिष्टमंडळाची भेट घेतली या वेळी अभाविप तर्फे खालील मागण्या पुणे महानगर मंत्री प्रदीप गावडे यांनी केल्या 

) विद्यापीठातील वारंवार होणारा पेपर फुटीचा प्रकार पाहता परीक्षा नियंत्रक हा गैरप्रकार रोखण्यात पूर्णपणे असफल झाले आहेत त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे.

) ज्या महाविद्यालयांमधून हे पेपर फुटले आहेत त्यावर फैजादारी कार्यवाही केली जावी तसेच या महाविद्यालयांचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे.

) या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी व सर्व दोषींवर कार्यवाही केली जावी.

) या पेपरफुटी मुळे कुठल्याही प्रामाणिक विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही तसेच पुठील काळात प्रश्नपत्रिका फुटू नये या साठी उपाययोजना करावी.