BMW मोटोरॅड G 310 R आणि BMW G 310 GS करिता प्री-बुकिंग्ज सुरू

Share this News:

ग्राहक BMW G 310 R आणि BMW G 310 GSमोटरसायकल्सच्या ऑफिशियल लाँचआधी INR 50,000 मध्ये ही मोटरसायकल प्रीबुक करू शकतील.मोटरसायकलचे प्रीबुकिंग देशभरातील कोणत्याही ऑथोराइज्ड BMW मोटोरॅड डीलरशीपमध्ये करता येईल. डिलिव्हरी प्रथम येणायास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार करण्यात येईल.

मोटरसायकल्स प्रीबुक करण्याकरिता, ग्राहक मोटोरॅड आऊटलेटला भेट देऊ शकतात किंवा www.bmw-motorrad.in वर एन्क्वायरी फॉर्म ऑनलाईन भरून कॉल बॅकची विनंती करू शकतात.

BMW ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट श्री. विक्रम पावाह म्हणाले, ”BMW मोटोरॅडकडे डिझायनिंग मोटरसायकल्सचा वारसा आहे, जी अद्वितीय रायडिंग प्लेझर, उत्तम परफॉर्मन्स व खात्रीदायक क्वालिटी यांचे अनोखे संयोजन एकत्रितपणे सादर करते. जेव्हा BMWमोटोरॅडने सब-500 cc प्रीमियम सेगमेंटमधील आपल्या प्रवेशाची घोषणा केली, तेव्हा मोटरसायकल इंडस्ट्रीमध्ये खळबळ निर्माण झाली. बहुप्रतिक्षित BMW G 310 Rआणि BMW G 310 GS सह BMW मोटोरॅड भारतात केवळ प्रवेश करणार नाही, तर या सेगमेंटला पुनर्परिभाषित करणार आहे. या दोन्ही मोटरसायकल्स भारतीय रस्त्यांकरिता बनविण्यात आल्या आहेत आणि त्या खरा BMW अनुभव रास्त दरांमध्ये घेऊ देणार आहेत. शेवटी आता प्रतिक्षा संपली आहे, कारण आमच्या ग्राहकांसाठी आम्ही लाँचच्या आधी प्रीबुकिंग्ज सुरू केल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की, जगातील इतर देशांप्रमाणेच BMW G 310 R आणि BMW G 310 GS भारतातही भरघोस यश प्राप्त करतील.”

नवीन लाँच करण्यात येणाया, BMW G 310 R मध्येBMW मोटारॅड मधील सर्व वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत : इनोव्हेशन, क्वालिटी व प्रबळ प्रोडक्ट सब्स्टान्स. जागतिक बाजारपेठेकरिता खासकरून डिझाईन करण्यात आलेली ही मोटरसायकल BMWप्रीमियम महत्वाकांक्षेला 500 cc सेगमेंट अंतर्गत सादर करते. BMW G 310 R मध्ये BMW रोडस्टरचे खरे तत्व सामावलेले आहे आणि ही देशात व देशाबाहेर दोन्हीकडे डायनॅमिक परफॉर्मन्स आणि कम्फर्ट सादर करते.

BMW G 310 GS हा उत्साह पुढे टिपिकल GSक्षेत्रामध्ये नेत आहे त्यामुळे दोन चाकांवर शानदार साहसी प्रवास अनुभवता येणार आहे. BMW G 310 GSही खरी GS आहे : ही अशी आधुनिक मोटरसायकल आहे, जी परिपूर्ण आहे आणि सेगमेंटमध्ये अद्वितीय आहे. ही मोटरसायकल ट्रॅफिकमध्ये गतीशील व चपळ असली तरीही कठीण अशा भूप्रदेशाकरिताही अत्यंत मजबूत आहे. हिची चपळता रायडिंगचा पूर्णपणे नवीन अनुभव प्रदान करते.

BMW G 310 R आणि BMW G 310 GS ची विक्री व सर्व्हिसिंग BMW मोटोरॅडच्या प्रीमियम डीलर नेटवर्कद्वारे करण्यात येईल, जे भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई,बंगलोर, अहमदाबाद व कोची अशा महत्त्वाच्या सेंटर्समध्ये उपस्थित आहे. BMW मोटोरॅडच्या चंदिगढ व कोलकाता मधील आगामी डिलरशीप्स मोटरसायकल्सच्या लाँच नंतर बुकिंग्ज स्वीकारायला सुरुवात करतील.

ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या BMW मोटोरॅड मोटरसायकल्सची मालकी मिळवता यावी याकरिताBMW फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया सानुकूल व लवचिक आर्थिक उपाय सादर करणार आहे. ग्राहक डिलिव्हरी होण्याआधीही त्यांचे लोन प्रीअॅप्रूव्ह्ड करुन घेऊ शकतात.