Eulogy by Sanjeevani Mujumdar for Dr Zeliot

Share this News:

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रभावित झालेल्या आणि भारतातील बौद्ध धम्म आणि दलित चळवळीच्या प्रमुख अभ्यासक डॅा. एलिनॅार झेलिएट यांचे नुकतेच निधन झाले. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत डॅा. एलिनॅार झेलिएट यांचे बरेच लेख प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालयाला अनेक वेळा भेट दिली होती. तसेच त्यांचे लेख संग्रहालयाच्या ग्रंथालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत अशी आठवण संस्थेच्या मानद संचालिका सौ. संजीवनी मुजुमदार यांनी सांगितली.

संग्रहालयाच्या आवारात दोन दिवसांची कॅान्फरन्स आयोजित केली होती, यामध्ये डॅा. एलिनॅार झेलिएट यांनी भाग घेतला व  Dr. Ambedkar and the search for a meaningful Buddhism  हा लेख सादर केला होता. त्यानंतरही त्यांनी पुण्यात आल्यावर संग्रहालयाला आवर्जुन भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी खास महाराष्ट्रीयन साडी परिधान केली होती. त्यांचे विद्यार्थी जेव्हा पुण्यात येतात तेव्हा तेही संग्रहालयाला आवर्जुन भेट देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांनी Ph.D. पण केली आहे. अशी आठवण  सौ. संजीवनी मुजुमदार यांनी व्यक्त केली.