Hindutva organizations protest against Sunburn Festival

Share this News:

   


            
चांदणी चौक (पुणे) येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे निषेध आंदोलन
संस्कृतीकडे कि व्यसनाधीनतेकडे ? – तरुण पिढीने करावी निवड 
पुणे – ‘सनबर्न फेस्टिव्हल’ म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्ध्वस्त करणारा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीत असा हा फेस्टिव्हल होणे म्हणजे संस्कृती नष्ट करण्याचाच प्रकार होय. ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध म्हणून चांदणी चौकात बावधन, लवळे, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांनी संस्कृतीरक्षण आंदोलन केले. या प्रसंगी ‘सनबर्न फेस्टिव्हल हद्दपार करा’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या, तसेच सनबर्न फेस्टिव्हलच्या विकृतीच्या विरोधात सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधातील मत परखडपणे मांडून कार्यक्रमाच्या आयोजकांची करचुकवेगिरी, दांभिकपणा आणि केलेली सरकारी नियमांची पायमल्ली यांवर टीका केली. आंदोलनकर्त्यांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला केवळ पुण्यातूनच नाही, तर भारतातून हद्दपार करण्याचा निर्धार केला. आंदोलनामध्ये एका छोट्या जिवंत देखाव्याद्वारे ‘पाश्‍चात्त्य विकृतीच्या प्रभावामुळे व्यसनांच्या आहारी जात असलेले तरुण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यात संस्कृतीचे पालन आणि रक्षण करणारे तरुण दाखवून युवा पिढीने व्यसनाधीनता आणि संस्कृती यांपैकी कशाची निवड करायची, ते ठरवावे’, असे आवाहन करण्यात येत होते. या वेळी वाहतुकीला अडथळा न होता प्रातिनिधीक स्वरुपात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. 
  कार्यक्रमस्थळापासून जवळच डीआरडीओची उच्च ऊर्जा सामग्री अनुसंधान प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत अतिसंवेदनशील आणि उच्च ऊर्जा असलेल्या सामग्रीवर चाचणी आणि संशोधन केले जाते. अशा अतिसंवेदनशील भागात कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात येणार्‍या परदेशी नागरिकांच्या माध्यमातून आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी केसनंद येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या मंचाला मोठी आग लागली होती. तेथे आगप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध नव्हती. नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरक्षेच्या कारणास्तव वायुदल आणि विमानतळ प्राधिकरणाने यंदा सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती दिली नव्हती. आयोजकांनी याआधी करचुकवेगिरी करून गोवा शासनाची फसवणूक केली आणि तिथून पळ काढला. आता पुण्यातही त्याची पुनरावृत्ती करून पुण्यातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत अडकवून येथूनही शासनाचे पैसे बुडीत करून पळ काढल्यास प्रशासनाला कोणता महसूल मिळणार आहे ? या गोष्टींचा विचार करता शासन इतक्या सहजतेने आणि निर्धास्तपणे सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती का देत आहे ?, या प्रश्‍नावर वक्त्यांनी लक्ष वेधले. ग्रामस्थांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याची आणि कार्यक्रमस्थळी एकही गाडी जाऊ न देण्याची चेतावणी दिली आहे.                                                  

आंदोलनामध्ये उपस्थित असलेले मान्यवर : कोथरूडचे नगरसेवक श्री. किरण दगडे-पाटील, बावधनच्या सरपंच सौ. पियुषा दगडे-पाटील, माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, बावधनचे माजी सरपंच श्री. राहुल दुधाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन दगडे, श्री. आझाद दगडे, सौ. वैशाली दगडे, श्री. वैभव मुरकुटे, सचिन धनदुडे, सुनील दगडे, धनंजय दगडे, गणेश कोकाटे, श्री. उमेश कांबळे,  सौ. वैशाली कांबळे, श्री. निळकंठ बजाज, श्री. दीपक दुधाणे, श्री. नितीन दगडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे यांच्यासह ४०० हून अधिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.