People launch drive against burglaries in Erandawane, Deccan area

Share this News:

अलंकार पोलिस स्टेशन हद्दीत भाजप चे कार्यकर्ते बजावणार पोलिस मित्रांची भुमिका…गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागरण अभियान राबविणार…
–्—्—्—्—=========–्—्–=-====
अलंकार पोलिस स्टेशन च्या हद्दीत चेन स्नॅचिंग च्या प्रकारांवर प्रभावी कारवाई च्या माध्यमातून आळा घातल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्री. बी. जी. मिसाळ यांचा आज भाजप च्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर एरंडवण्यात वाढत्या घरफोड्यांबाबत चिंता व्यक्त करतानाच पोलिस खात्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे व जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन ही करण्यात आले. या वेळी भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,भाजयुमो चे शहर सरचिटणीस सुशील मेंगडे,कोथरूड मंडल सरचिटणीस कुलदीप सावळेकर,शिक्षण मंडळ सदस्य मंजुश्री खर्डेकर,अनुराधाताई एडके,संगीताताई आदवडे,माजी नगरसेवक विभीषण मुंडे,अशोक शेलार,सुधीर फाटक,दीपक राव,राज तांबोळी,रमेश चव्हाण,जगदीश देडगे,शफी शेख,सुमीत दिकोंडा,संतोष आयवळे,ई उपस्थित होते. यावेळी घरफोडी चे प्रकार रोखण्यासाठी पोलिस खात्यातर्फे विविध सोसायटी भागात बैठका आयोजित करत असल्याचे मिसाळ साहेबांनी स्पष्ट केलें. जनजागृती मोहिमेत भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभाग देतील असे संदीप खर्डेकर व सुशील मेंगडे यांनी सांगितले तर पक्षातील एक टीम “पोलिस मित्र” म्हणून काम करेल व नाईट राउंड सह गुन्हेगारी ला आळा घालण्यासाठी ” “आपला शेजारी खरा पहारेकरी” ही मोहिम राबविण्यात येइल असे राज तांबोळी,अशोक शेलार,सुधीर फाटक यांनी स्पष्ट केले. महिलांच्या समस्यांवर व वस्ती विभागातील प्रश्नांबाबत एक स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सौ मंजुश्री खर्डेकर,अनुराधाताई एडके ,संगीताताई आदवडे यांनी सांगितले.येत्या आठवडयात घरोघरी पत्रक वाटुन जनजागृती मोहिम सुरु करण्यात येणार असल्याचे कुलदीप सावळेकर यांनी जाहीर केले.