Protest against Salman Khan, Shilpa Shetty for their casteist remarks against Valmiki community

Share this News:
Protest against Salman Khan, Shilpa Shetty for their casteist remarks against Valmiki community

मेहत्तर वाल्मिकी रुखी समाज पुणे शहरच्यावतीने अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहत्तर वाल्मिकी रुखीसमाजाच्या विरोधात जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल निदर्शने आंदोलन

मेहत्तर वाल्मिकी रुखी समाज पुणे शहरच्यावतीने अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहत्तर वाल्मिकी रुखीसमाजाच्या विरोधात जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल मेहत्तर वाल्मिकी रुखी समाजाची मने दुखावली गेली त्यामुळे पुणे कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील गोगामेढीसमोर निदर्शने आंदोलन करून निषेध सभा घेण्यात आली .मेहत्तर वाल्मिकी समाजाचे नेते डॉ. अनुपम बेगी यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आले .यावेळी मेहत्तर वाल्मिकी समाजाचे नेते डॉ. अनुपम बेगी यांनी सांगितले कि , अभिनेता सलमान खान व व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल या दोघांना त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा . तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी.अशी मागणी केली .

यावेळी ऍड कबीर बिवाल यांनी अभिनेता सलमान खान व व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल त्यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले .

या आंदोलनात अरविंद चव्हाण , विजय बेद , नरोत्तम चव्हाण , भिकाचंद मेमजादे , दादा चव्हाण , मंगेश चंद्रमौर्य , रवी भिंगानिया , किशोर साळुंके , घनश्याम सुसगोहेर , कैलाशकुमार , महेश जेधे , यशवंत गोहेर , किशोर राठी , अनिल चावरे , हेमंत बिगे , बंडू चव्हाण , विलास मकवाना , राजेश परदेशी , तुळशीदास चव्हाण , विनोद मकवाना , मधुमती काळे , निखिल शिंदे , सुरज भारवासे , काळुराम शिंदे , निखिल बेद , राजेश जिनवाल , सुरेश भारवासे , दादा मकवानी , बाबुलाल बेद , शेखर लोट , मनोज पटेलिया व मोठ्या संख्येने मेहत्तर वाल्मिकी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .