Protest by ABVP in SPPU

Share this News:

आज दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ रोजी अभाविपने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असलेल्या Strength of Materials ह्या विषयाची Model answer sheet चुकीची असल्यामुळे तसेच अभियांत्रिकीच्या पुनर्मुल्यांकनमध्ये तपासणी नीट न झाल्यामुळे आंदोलन केले. ह्या सर्व प्रकारामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
Strength of Materials विषयाच्या model answer sheet मधील सर्व चुका गृहीत धराव्या व प्रश्न सोडवला असल्यास त्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळावे तसेच इतर सर्व विषयांचा revaluation परत करण्यात यावे अशी मागणी आज अभाविपने केली होती.
आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ते व विद्यार्थ्यांशी भेटून, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सर्वांना आश्वस्त केले आहे कि SOM ह्या विषयाच्या संधार्बात समिती बसवलेली आहे व समिती च्या अहवालात जे प्रश्न चुकीचे आहेत असे आढळेल त्यांचे सरसकट गुण सर्व अनुतीर्ण विद्यार्थ्यांना मिळतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना असे वाटते कि त्यांचे पुनर्मुल्यांकन योग्य रीतीने झालेले नाही त्यांनी दि. १० ऑक्टोबर पर्यंत आपली Photocopy परीक्षा विभागात जमा करायची आहे. विद्यापीठ परत उत्तरपत्रिका तपासून ८ दिवसात निकाल लावेल असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिल्यावर अभाविपने आंदोलन मागे घेतले.
१८ तारखेपर्यंत सर्वे निकाल जाहीर न झाल्यास, अभाविप परत अजून तीव्रतेने आंदोलन करेल असा इशारा ह्या वेळी कुलगुरूंना अभाविप तर्फे देण्यात आला. ह्या वेळी महानगर मंत्री राघवेंद्र रिसालदार, राघव पुराणिक, अभिषेक देशपांडे, सौरभ गर्ग, अखिल पांडे उपस्थित होते.