पुणे मेट्रोचे रूळ टाकण्यास सुरवात 

Share this News:

पुणे मेट्रो रेल प्रकल्पात २ मार्गिका आहेत . पीसीएमसी ते स्वारगेट १६.६ किमी व वनाज ते रामवाडी १४.६ किमी लांबीच्या मार्गिका आहेत. त्यापैकी पीसीएमसी ते रेंज हिल्स ह्या ११.५७ किमी मार्गावर अंत्यत वगाने उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरु आहे . या मार्गावरच पुणे मेट्रोने डिसेंबर २०१९ मध्ये चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे . या अनुषंगाने या मार्गावर रेल्वे रूळ टाकण्याचे काम ११.०७.२०१९ रोजी सुरु झाले आहे . पीसीएमसी ते संत तुकारामनगर मेट्रो स्थानका दरम्यान या कामाची सुरवात झाली आहे. पुणे मेट्रोचे रूळ हे स्टँडर्ड गेज (१४३५ एमएम ) या प्रकारातले असून (85॥85॥€55) बॅलास्ट विरहीत पण असणार आहे.

 

पुणे मेट्रो (॥८ ६० ६ १, १०८० ग्रेड, हेड हार्डन याप्रकारचे रेल्वे रूळ वापरणार आहे. जगभरातल्या अत्याधुनिक रेल्वे प्रणाली याच प्रकारचे रेल्वे रूळ वापरत आहे. महामेट्रोसाठी रेल्वे रूळ १८ मीव २५मीया लांबीमध्ये वापरण्यात येणार आहे . हे रेल्वे रूळ अत्याधुनिक फ्लॅश बट व अल्युमिना धर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहे . अश्या जोडलेल्या रेल्वे रुळांचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक मशीनद्वारे टेस्टिंग केले जाणार आहे. या रेलचा वरचा भाग (हेड) हा विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे कठीण (हार्ड) केलेला असेल त्यामुळे या रुळाची झीज कमी होईल व त्यामुळे रुळांचे आयुष्य वाढेल व रूळ बदलण्याची लवकर लवकर आवश्यकता पडणार नाही .

 

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ९००० |, रुळांची आवश्यकता आहे . रिच १ व रिच २ प्रायारीटी सेक्शन साठी एकूण ३००० ॥॥॥ रूळ लागणार आहेत . नागपूरहून ६०० ॥॥ 1 रूळ पुण्यासाठी सध्या येणार आहेत. हे रूळ इस्ट मेटल ५ ७ या स्वित्झर्लंडच्या कंपनीने त्यांच्या सायबेरियातील कारखान्यात बनविले आहेत.

 

पुणे मेट्रोचा उन्नत व भूमिगत मार्गाचा ट्रॅक हा बॅलास्ट लेस या प्रकारातला असणार आहे . सामान्यतः रेल्वे प्रणालीत रेल्वे रूळ दगडाच्या खडीवर ( बॅलास्ट) टाकण्यात येतात . जेणेकरून रेल्वे रुळावरून कोच जाताना रेल्वे रूळ खाली दाबले जाऊन कुशन सारखा परिणाम साधता येतो. बॅलास्ट सहित (83०51९5) रुळांचे अनेक तोटे असल्यामुळे पुणे मेट्रो मध्ये बॅलास्ट विरहीत (83॥95€55) रूळ टाकण्यात येणार आहे.

यामुळे प्रवाशांना आरामदायक (कम्फर्ट) मध्ये वाढ होणार आहे. अशाप्रकारचा बॅलास्ट विरहीत ट्रॅकचे इतरही अनेक फायदे आहेत .

१) कमीत कमी देखभालीची गरज

२) पर्यावरणास अनुकूल

३) प्रदूषण मुक्‍त

४) रायडींग कम्फर्ट चांगला

५) रेल्वे रुळांची आयुष्य वाढवण्यासाठी मदतगार

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे कि , पुणे मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेनुसार सुरु करण्यासाठी संपूर्ण नियोजन झाले असून त्याचाच एक हिस्सा म्हणून रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.