अडचणीत असलेल्या रिक्षाचालकां साठी पोलीस आले धाऊन

Share this News:

 पुणे, 29 एप्रिल 2020- लोकडावून चा कालावधी जस जसा वाढत चालला आहे तस तसे मध्यम वर्गीय नागरिक अडचणीत येऊ लागले आहेत.रोजच्या कमाई मधून स्वतःचे कुटुंब चालविणारे अनेक जण सध्या अडचणी मध्ये आहेत असेच काही रिक्षा चालक त्यांची रिक्षा बंद असल्याने घरी आहेत व कौटुंबिक अडचणीत सापडले आहेत असे दत्तवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना समजताच त्यांनी स्वतः या रिक्षा चालकांना बोलावून त्यांना काही दिवस पुरेल असा शिधा दिला आहे.

या प्रसंगी रिक्षा चालक यांनी सांगितले की,आम्ही कायम दंडात्मक कारवाई करणारे पोलिस बघितले पण आज आमची कुटुंब आर्थिक अडचणीत आहे जे समजल्यावर स्वतः घेवारे साहेब यांनी आम्हाला शिधा दिला व आमची काळजी घेतली आहे.

या प्रसंगी देविदास घेवारे यांनी सांगितले की,शासनाने सर्व समाजा करिता तयार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करून घेणे हे पोलिस विभागाचे काम आहे त्या मुळे कधी कडक धोरण स्वीकारावे लागते परंतु ज्या वेळेस एखादा व्यक्ती अडचणीत असतो तेव्हा त्याला माणुसकीच्या नात्याने मदत सुद्धा त्याच तत्परतेने केली पाहिजे.