SPPU’s Ranade Institute ordered to display merit list with marks of students

Share this News:
Ranade Institute campus on FC Road

पुणे प्रतिनिधी,
विशाल मुंदडा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भाग – 1

#शिक्षणाचेमाहेरघर म्हणून ओळखले जाणारे #सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी विद्यार्थ्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव, कधी उत्तरपत्रिकेच्या डुप्लिकेट प्रतिसाठी एफआयआर बंधनकारक, गुणपडताळणी चा गोंधळ, कधी निकालाची बोंब.
पण या सर्वांना बगल देत विद्यापीठाच्या कुलसचिवांनी एक सकारात्मक निर्णय दिला आहे. नॅक समितीने विद्यापीठाला प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणण्याच्या सूचना केल्या होत्या. हाच मुद्दा घेऊन मी ही सतत माहिती अधिकाराच्या माध्यमातून हाच प्रयत्न करत आहे. त्यात मला #अंशतः #यश आले आहे. {(अपिलीय अधिकाऱ्यांच्या म्हणजेच #कुलसचिवांच्या शब्दात) परंतु हा #संघर्ष पुढे #पारदर्शकतेच्या मुद्यावर चालूच राहणार आहे.}
माहिती अधिकाराच्या माध्यमातून विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या (रानडे इन्स्टिट्यूट) मागील वर्षीच्या प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता याद्या गुणांसह देण्याची मागणी केली होती. अपेक्षित असल्याप्रमाणे त्यास नकार मिळाला. (आम्ही कधीच यापूर्वी अश्या प्रकारे याद्या लावल्या नसून आताही लावणार नाहीत.) मी सवयीप्रमाणे प्रथम अपील दाखल केले. अखेर #अपील #अंशतः मान्य करत मा. कुलसचिवांनी मागील वर्षीच्या गुणवत्ता याद्या गुणांसह 15 दिवसात देण्याचे आदेश दिलेच पण यापुढे दरवर्षी गुणवत्ता याद्या या गुणांसह सूचना फलकावर लावण्याची सूचना ही त्यांनी विभाग प्रमुखांना केली.
हे #पारदर्शकतेच्या दृष्टीने #विद्यापीठाचे महत्वाचे व #पत्रकारिता #विभागासाठी #ऐतिहासिक पाऊल असल्याचे मला वाटते. (लोकशाहीचा चौथा स्तंभ घडवणाऱ्या विभागासाठी)
शेवटी एवढेच की मा. कुलगुरूंनी या सर्व प्रकरणाची दखल घेत विद्यापीठाच्या सर्व विभागांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना आपापल्या विभागांच्या प्रवेश प्रक्रियेच्या #गुणवत्तायाद्या या #गुणांसह लावण्याचे आदेश देऊन नॅक कडून मिळालेल्या ‘अ’+ श्रेणी दर्जा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
याची अंमलबजावणी ही तातडीने म्हणजेच चालू शैक्षणिक वर्षांपासून (2017-2018) करावी एवढी माफक अपेक्षा.