आश्वासने पूर्ण करत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसून देणार नाही – अजित  पवार

Share this News:

यवतमाळ दि. ३ – जनतेला दिलेली सर्व आश्वासने सरकार जोपर्यत पूर्ण करत नाही
तोपर्यत सभागृह चालू देणार नाही आणि सरकारला स्वस्थही बसू देणार नाही असा
इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कामठवाडा येथील सभेत दिला.


पदयात्रेमध्ये चालत असताना मार्गावर असलेल्या कामठवाडा येथे अजित पवार यांची
सभा झाली. या सभेच्या अगोदर महिला शेतकरी पुष्पा शिवसकर, फवारणीने बाधित
झालेला शेतकऱ्यांनी सरकारच्या कारभाराविरोधी संताप व्यक्त केला.


अजित पवार पुढे म्हणाले की,जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले पण त्यांच्या
स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. साडेतीन वर्षामध्ये या सरकारने
शेतकऱ्यांना फक्त खोटी आश्वासनेच देवून फसवले आहे. राज्यातील जनता सरकारला
कंटाळली आहे. त्यांचा हा आवाज सरकारपर्यंत पोचवून त्यांना झोपेतून जागं
करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असल्याचे सांगितले.


या सभेनंतर अजित पवार आणि पक्षाच्या नेतेमंडळींची दुसरी सभा खुटाळा
गावामध्येही झाली. या सभेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी
सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत
पाटील,विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे,आमदार विदया चव्हाण,आमदार
राणा जगजितसिंग पाटील,आमदार ख्याजा बेग, माजी आमदार संदीप बजोरिया, माजी
मंत्री अनिल देशमुख,माजी मंत्री गुलाबराव देवकर,राष्ट्रीय महिला अध्यक्षा
फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,प्रवक्ते महेश
तपासे,जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,
मनिषा काटे,आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला आणि शेतकरी उपस्थित होते.