एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद पुढे ढकलण्यात आली आहे
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एनएसआयसी)आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद उद्या अल्पबचत भवन येथे पार पडणार होती. पण ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेमुळे ही परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयीची अधिक माहिती लवकरच आपल्याला कळवण्यात येईल.
