केंद्रसरकार लवकरच अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सक्षमीकरण निधी लवकरच उपलब्ध करून देणार

Share this News:

केंद्रसरकार लवकरच अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सक्षमीकरण निधी लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय , अल्पसंख्यांक व औकाफ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले .

महाराष्ट्र मुस्लिम संघाच्यावतीने पुणे लष्कर भागात भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ प्रवक्ते माधव भंडारी यांची महाराष्ट्र राज्याच्या पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी ( मंत्री दर्जा) नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम संघाचे कोअर कमिटी सदस्य इसहाक चावीवाले यांच्याहस्ते सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले . त्यावेळी अल्पसंख्यांक व औकाफ राज्यमंत्री राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यांनी सांगितले कि, अल्पसंख्यांक समाजाचा विकासासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रसरकार कडून निधी उपलब्ध होणार आहे .

यावेळी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी , रफिक ठाकूर , डॉ संजय सोनवणे , अशोक जॉर्ज फादर लुईस , फारुख शेख , समीर इसहाक शेख , चेतन शर्मा , अक्रम शेख , समीर शेख , तांबोळी समाजाचे कार्यध्यक्ष नजीर तांबोळी , जयप्रकाश पुरोहित , भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष आबू मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमात सामाजिक कार्यात इसहाक चावीवाले , डॉ संजय सोनवणे ,शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात फादर व्ही , लुईस , शैक्षणिक व सामाजिक कार्यात ए. ए. मुल्ला , शैक्षणिक कार्यात नुसरत ठाकूर यांचा सामाजिक कार्य केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रास्तविक रफिक ठाकूर यांनी केले सूत्रसंचालन अशोक जॉर्ज यांनी केले तर आभार ऍड. फकीर मोहम्मद ठाकूर यांनी मानले .