क्रेडाई महाराष्ट्रच्या वार्षिक परिषदेचे नाशिक येथे आयोजन
पुणे :- क्रेडाई महाराष्ट्राकडून येत्या १३ आणि १४ जुलैला नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ही सहावी वार्षिक परिषद आहे.या परिषदेत महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरातून १००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक उपस्थित असणार आहेत.
ही नोंदणी क्रेडाई तर्फे होणार असून हा क्रेडाईच्या इतिहासातील उच्चांक ठरणार आहे असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केला.
या परिषदेला वकील, वास्तुविशारद, कायदे सल्लागार,बँकर्स, अभियंते देखील उपस्थित राहू शकतील. ही परिषद सशुल्क असून सर्वांसाठी खुली असणार आहे.
क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर, अध्यक्ष जक्षय शहा, उपाध्यक्ष बोमन इराणी, माजी चेअरमन इरफान रझाक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख एस.चोकलिंगम
महारेरा नंतरच्या १ वर्षाच्या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांवर झालेला सकारात्मक बदल/परिणाम यावर गौतम चटर्जी व सतीश मगर मार्गदर्शन करणार आहेत.
गीतांबर आनंद, इरफान रझाक हे ‘रियल इस्टेट ब्रँडिंग’ या विषयावर बोलणार आहेत. भूमी अभिलेखचे संचालक एस.चोकलिंगम हे जमिनीचे मालकी हक्क यामध्ये सरकार काय पाऊले उचलत आहे याबद्दल माहिती देणार आहेत.
सध्या भूखंड पाडून मोठ्या प्रमाणावर ‘प्लॉटिंग‘ चा व्यवसाय चालू असून त्यातील भविष्यातील वेध घेण्याचा प्रयत्न शांतीलाल कटारिया करणार आहेत.
परवडणारी घरे,म्हाडाअंतर्गत पब्लिक-प्राय
बोमन इराणी बांधकाम व्यवसायातील यशस्वी आणि नामवंत कंपन्यांचे चढ-उतारांचे आलेख व त्यांची कारणमीमांसा याबद्दल आपले मत मांडणार आहेत.
