खा. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान
पुणे :
खा.वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज ६ जुलै रोजी ससून रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहाराचे वाटप केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक राठी आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
‘ससून रुग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसोबतच राहावे लागते, अशावेळी त्यांची जेवणाची गैरसोय होते, याकरीता खा. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला’, अशी माहिती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस अमित कदम यांनी पत्रकाद्वारे दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून २५० जणांना सात्विक आहाराद्वारे अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, अशोक राठी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे, शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमित कदम, दिव्या चव्हाण- जाचक, मारवाडी समाज धर्मशाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.
