गजर कीर्तनाचा अक्षय्य तृतीया विशेष

Share this News:

साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त असणारी ‘अक्षय्य तृतीया’ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुध्द तृतीयेला येते. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय्य (न संपणारे) असे मिळते. सणासुदीचे दिवस प्रत्येकासाठी आनंदमयी  असतात. ‘अक्षय्य तृतीया’च्या निमित्ताने आनंदाचं अक्षयधन उधळत झी टॅाकीजवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदा चा या कार्यक्रमात सोमवार २४ एप्रिल ते रविवार ३० एप्रिल दरम्यान सात दिवसीय विशेष कीर्तन रंगणार आहे.

वेगवेगळ्या विषयांवर हे कीर्तन रंगणार आहे. ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर,  ह.भ.प पांडुरंग महाराज शितोळे,  ह.भ.प योगीराज महाराजगोसावी,  ह.भ.प दत्ता महाराज ढोन्नर,  ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाठाडे व वैष्णवी दीदी हे कीर्तनकार आपल्या खास शैलीत हे कीर्तन सादर करणार आहेत. २४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान रोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत कीर्तनाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगणारा हा कीर्तन सोहळा प्रेक्षकांना नक्कीच आनंद देईल.