घरातील नैसर्गिक कचऱ्यापासून शहर शेती उत्तमरित्या होते – ज्योतीताई शहा
पुणे, दि ३ जून : विना खर्च, विना माती, विना जमीन शहरातील नागरिकांनी शहर शेती कशी करायची याचे धडे नैसर्गिक शहर शेतीच्या उपासक ज्योतिताई शहा यांनी अन्नदाता आणि वनराई आयोजित “शहर शेती“ या विषयावरील कार्यशाळेत दिले.
ज्योतीताई शहा म्हणाल्या, घरातील जो नैसर्गिक कचरा आहे, त्याला कचरा न म्हणता ‘झाडांचा खाऊ‘ असे म्हणले गेले पाहिजे. नैसर्गिक कचऱ्यामध्ये भाजीच्या काड्या, चहाचा चोथा, राहिलेलं अन्न, देवाचं निर्माल्य, घरामध्ये झालेली धूळ अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. घरातील सर्व नैसर्गिक कचरा वापरून आपण शहर शेती उत्तमरित्या करू शकतो. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचऱ्यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात. यासंदर्भातील सादरीकरण आणि प्रात्यक्षिक यावे
शहरांमध्ये आज कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. सांडपाण्याच्या समस्येनेसुद्धा चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. प्रदूषित पाणी पशू –पक्षी आणि माणसाच्या आरोग्यासाठी घातक झाले आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण करून अधिकाधिक कचरा घरच्या घरी जिरविण्याची गरज सध्या भासत असल्याचे शहा यावेळी म्हणाल्या.
अन्नदाता आणि वनराई आयोजित “शहर शेती” ‘कचरा-सांडपा
डॉ. मराठे म्हणाले, “मित्र कीडा” हि संकल्पना आपल्यात रुजवली जावी. काही किडे हे किडयांनाच खातात, त्यामुळे शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्नधान्यातील भेसळ यामुळे एकूणच मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. किड्यांना मारल्यामुळे मूळ अन्नसाखळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवले पाहिजे असं मत कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे यांनी व्यक्त केलं.
