जागतिक फळबिया लागवड दिवसानिमित्त रविवारी ‘एआरएआय’ टेकडीवर ‘आयसीएआय’तर्फे वृक्षारोपण
पुणे : दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या पुणे विभाग आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए)
यांच्यातर्फे जागतिक फळबिया लागवड दिवसानिमित रविवार, दि. १५ जुलै २०१८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ऍटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) टेकडीवरील भांबुर्डा वन परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. जागतिक फळबिया लागवड दिवसानिमित्त १५ जुलै रोजी ५५५५५ फळबिया लावण्याचे उद्दिष्ट्य होते. प्रत्यक्षात मात्र १ लाख ३००० पेक्षा अधिक फळबियांची लागवड करीत या उपक्रमाने ऐतिहासिक नोंद केली होती.
यंदाही पर्यावरण संवर्धनात भरीव योगदान देण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवून सीए व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. आयसीएआय ही एक प्रधान संस्था असून, पुणे विभागात ७२०० सीए आणि २२ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सभासद आहेत. या उपक्रमात आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन आयसीएआय पुणे विभागाचे चेअरमन सीए आनंद जाखोटिया आणि आयसीएआयच्या डब्ल्यूआयसीएएसएच्या पुणे विभागाचे चेअरमन सीए राजेश अगरवाल यांनी केले आहे.
