जे. डी. पॉवर २०१७ इंडिया: फोक्‍सवॅगन पोलो इनिशिएल क्‍वॉलिटी स्‍टडीच्‍या प्रिमिअम कॉम्‍पॅक्‍ट विभागामध्‍ये अव्‍वलस्‍थानी

Share this News:

® फोक्‍सवॅगन पोलोने प्रिमिअम कॉम्‍पॅक्‍ट विभागामध्‍ये २०१७ साठी अव्‍वलस्‍थान कायम राखले
® फोक्‍सवॅगन वेन्‍टो मिडसाइज विभागमध्‍ये गेल्‍या वर्षाच्‍या स्‍थानावरून ३-या स्‍थानावर पोहोचली
® भारतीय ग्राहकांनी फोक्‍सवॅगनच्‍या दोन्‍ही कार्सना त्‍यांच्‍या विभागांमधील स्‍पर्धेच्‍या तुलनेत इनिशिएल क्‍वॉलिटीमध्‍ये उच्‍च स्‍थान दिले

पुणे, 10 जानेवारी २०१८: फोक्‍सवॅगनने विविध विभागांमध्ये अव्‍वलस्‍थान कायम राखल्याचे जे. डी. पॉवर २०१७ इंडिया इनिशिएल क्‍वॉलिटी स्‍टडी (आयक्‍यूएस)च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. फोक्‍सवॅगन पोलोने प्रिमिअम कॉम्‍पॅक्‍ट विभागामध्‍ये २०१७ साठी अव्‍वलस्‍थान कायम राखले आहे, तर फोक्‍सवॅगन वेन्‍टोने मिडसाइज विभागामध्‍ये २०१६ मधील ४थ्‍या क्रमांकावरून ३-या क्रमांकावर झेप घेतली आहे.

फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. अँड्रीस लॉरेमन म्‍हणाले, ”हा फोक्‍सवॅगन इंडियासाठी अभिमानास्‍पद क्षण आहे. पोलोने पुन्‍हा एकदा प्रिमिअम कॉम्‍पॅक्‍ट विभागामध्‍ये जे. डी. पॉवर इनिशिएल क्‍वॉलिटी स्‍टडीमध्‍ये अव्‍वलस्‍थान कायम राखले आहे. पोलोच्‍या यशासोबतच वेन्‍टोने देखील चांगली कामगिरी केली आहे.” ते पुढे म्‍हणाले, ”हा निकाल भारतीय बाजारपेठेसाठी उच्‍च दर्जाची उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रती असलेली आमची दीर्घकालीन कटिबद्धता दाखवतो.”

या निकालांबाबत बोलताना फोक्‍सवॅगन पॅसेंजर कार्सचे संचालक स्टिफन नॅप म्‍हणाले, ”फोक्‍सवॅगनने नेहमीच दर्जात्‍मक उत्‍पादनांना प्राधान्‍य दिले आहे. जे. डी. पॉवरमधील दोन्‍ही रँकिंग्‍ज आम्‍ही ग्राहकांच्‍या पसंतीनुसार सर्वोत्‍तम उत्‍पादने निर्माण करण्‍याला चालना देण्‍यासाठी असलेल्‍या आमच्‍या सातत्‍यपूर्ण दृष्टिकोनाला दाखवतात. ग्राहकांमधील जे. डी. पॉवरसंदर्भात असलेली विश्‍वसनीयता व प्रामाणिकपणा अद्वितीय आहे. २०१७ मध्‍ये पोलोने राखलेल्‍या अव्‍वलस्‍थानाचा आम्‍हाला अभिमान वाटत आहे. पोलो व वेन्‍टोला दिलेल्‍या पसंतीबाबत आणि ब्रॅण्‍डवर दाखवलेल्‍या सातत्‍यपूर्ण विश्‍वासासाठी आम्‍ही आमच्‍या सर्व ग्राहकांचे आभार मानतो.”

२०१० मध्‍ये भारतात फोक्‍सवॅगन पोलो दाखल करण्‍यात आली आणि या कारने आयक्‍यूएस अंतर्गत सहा विभागांमध्‍ये सर्वाधिक गुण प्राप्‍त केले. हे सहा विभाग आहेत फिचर्स/कंट्रोल्‍स/डिस्‍प्‍लेज, ऑडिओ/एन्‍टरटेन्‍मेंट/नेव्हिगेशन, सीट्स, एचव्‍हीएसी, वेहिकल इंटेरिअर आणि इंजिन/ट्रान्‍समिशन.

नोव्‍हेंबर २०१६ ते जुलै २०१७ दरम्‍यान खरेदी केलेल्‍या ८,५०० हून अधिक नवीन कार्सच्‍या मालकांनी दिलेल्‍या प्रतिसादावर २०१७ इंडिया इनिशिएल क्‍वॉलिटी स्‍टडी (आयक्‍यूएस) आधारित आहे. हे सर्वेक्षण २०१७ मधील मे ते सप्‍टेंबर दरम्‍यान भारतातील ४० शहरांमध्‍ये करण्‍यात आले. या सर्वेक्षणात नवीन कार घेतलेल्‍या मालकांना ओनरशीपच्‍या पहिल्‍या दोन ते सहा महिन्‍यांमध्‍ये अनुभवण्‍यास आलेल्‍या समस्‍यांचे मापन करण्‍यात आले आणि आठ समस्‍या विभागांमधील (नोंदविण्‍यात आलेल्‍या समस्‍यांच्‍या क्रमवारीनुसार नोंद) २०० हून अधिक समस्‍या लक्षणांची तपासणी करण्‍यात आली. हे आठ विभाग आहेत: इंजिन/ट्रान्‍समिशन; हिटींग, व्‍हेन्टिलेशन व कूलिंग (एचव्‍हीएसी); वाहन चालवण्‍याचा अनुभव; वेहिकल एक्‍स्‍टेरिअर; फिचर, कंट्रोल्‍स व डिस्‍प्‍लेज; वेहिकल इंटेरिअर; ऑडिओ, एन्‍टरटेन्‍मेंट व नेव्हिगेशन (एईएन); आणि सीट्स.

फोक्‍सवॅगन पोलोसंदर्भात ग्राहकांनी फक्‍त ६९ पीपी१०० (१०० कार्सप्रति समस्‍या) समस्‍यांची नोंद केली. हा आकडा विभागामधील सरासरी ९५६ पीपी१०० पेक्षा खूपच कमी होता. फोक्‍सवॅगन वेन्‍टोसंदर्भात ग्राहकांनी ७३ पीपी१०० समस्‍यांची नोंद केली आणि विभागामध्‍ये ही सरासरी ८३ पीपी१०० होती.