टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस आणि एसएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात स्टार्टअप 5K रनवॉकचे आयोजन
· मुलींचे आरोग्य आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप 5K रनवॉकचे आयोजन
· पुणे शहरातील स्टार्टअप कंपन्या तसेच विद्यार्थी गटांनी उपक्रमामध्ये घेतला मोठ्या संख्येने सहभाग
पुणे, २६ फेब्रुवारी २०१८ : टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबाएस) ही भारतातील उद्योगांना कनेक्टिव्हिटी आणि संपर्क क्षेत्रातील उपाययोजना पुरविणारी अग्रणी कंपनी व स्टार्टअप लीडरशीप प्रोग्राम (एसएलपी) यांनी बालिकांच्या शिक्षण व आरोग्यसेवांना प्रोत्साहन देण्यासाठी २६ फेब्रुवारी २०१८ रोजी पुण्यामध्ये स्टार्टअप 5K रनवॉकचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमांतर्गत खराडी आयटी पार्क ते वर्ल्ड ट्रेड सेंटर व पुन्हा खराडी आयटी पार्क असे ५ किलोमीटर अंतर धावून/चालून पूर्ण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाच्या हेतूला पाठिंबा देण्यासाठी स्टार्टअप क्षेत्रातील व्यक्ती तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या रनवॉकमध्ये भाग घेतला. या उपक्रमातून उभारला गेलेला निधी बालिकांच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये श्री. जोतीराम कौलागे, श्री. संग्राम देशमुख आणि श्री. सेल्वाराज नायडू यांनी अनुक्रमे पहिल्या तीन बक्षिसांवर आपले नाव कोरले. विजेत्यांना टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेसच्या पश्चिम प्रांताचे एसएमई ऑपरेशन्स विभागप्रमुख श्री. मन्नू सिंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना श्री. मन्नू सिंग म्हणाले, ”5K रनवॉक हा लैंगिक समानतेबद्दल समाजाला जागरुक करण्यासाठीचा एक महान उपक्रम आहे. पुणेकर आणि विशेषत: स्टार्टअप क्षेत्रातील व विद्यार्थी गटांतील मंडळींनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला व हा उपक्रम यशस्वी केला या गोष्टीचा मला आनंद आहे. ”
या उपक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करताना एसएलपीच्या प्रोग्राम लीडर डॉ. रेश्मा सागरी म्हणाल्या, ” मुलींच्या शिक्षण व आरोग्याचे प्रश्न सोडविण्याच्या कामी आपले पाठबळ देण्याच्या बाबतीत स्टार्टअप क्षेत्रामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेसच्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यापुढेही भरपूर काम करून समाजामध्ये दूरगामी बदल घडवून आणण्याची आमची आकांक्षा आहे.”
हा रन-फॉर-अ-कॉज उपक्रम सर्वांसाठी खुला होता व प्रामुख्याने नाविन्यपूर्ण संकल्पनांचे रचनाकार अर्थात इनोव्हेटर्स, नव्या कंपन्यांचे संस्थापक, व्हीसी, व्यावसायिक इत्यादी स्टार्टअप परिसंस्थेतील विविध सदस्यांना अनुलक्षून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंचलित बाइकवॉश क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी – माय बाइक वॉश, क्रिडापटूंना सर्वोत्तम कामगिरीसाठी सिद्ध होण्यास मदत करणारी क्रिडा तंत्रज्ञान कंपनी – स्पारअप, भावभावनांना इमोशन फेल्ट छायाचित्रे काढणारी पिक अ शूट ही कंपनी, अंतर्गत सजावटीच्या क्षेत्रातील टेक स्टार्टअप कंपनी कलर युअर ब्लॅंक स्पेसेस आणि नैसर्गिक, घरगुती होमिओपॅथिक आरोग्य आणि सौंदर्य उत्पादने बनविणारी रिडा वेलनेस अशा काही स्टार्टअप कंपन्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
