डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी 5पैसा डॉट कॉम पश्चिम भारतातील टायर दोन आणि तीन शहरांमध्ये आक्रमकपणे शिरकाव करणार: पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळू शकतील अशी कंपनीला आशा

Share this News:

पुणे, 21 जून, 2017: आयआयएफएल समुहाचा भाग असणारी आणि झपाट्याने विस्तारत असणारी डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी 5पैसा डॉट कॉम भारताच्या पश्चिम भागातील टायर दोन आणि तीन शहरांमध्ये वृद्धीसाठी प्रयत्नशील आहे. स्वतंत्र कंपनी म्हणून कार्य सुरू केल्यावर 5पैसा डॉट कॉम ने या बाजारांमध्ये समाधानकारक वृद्धी बघितली आहे ज्यात पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथून ग्राहकांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर भर पडली आहे.

 

कंपनी झिरोढा, आरकेएसव्ही, सॅमकॉ सिक्युरिटीज, एसएएस, ट्रेड स्मार्ट ऑनलाईन अशा आघाडीच्या डिस्काउंट ब्रोकर्स बरोबर इक्विटी प्रकारात आणि पॉलिसीबझार.कॉम आणि कव्हरफॉक्स अशा इन्शुरन्स पोर्टल बरोबर स्पर्धा करते.

 

गेल्या वर्ष भरात समाधानकारक सुरवात केल्यावर कंपनीने देशाच्या पश्चिमेतील बाजारात चांगली वृद्धी बघितली आहे खासकरून महाराष्ट्रात आणि आपल्या सेवेला सरस तंत्रज्ञानाची जोड देऊन या बाजारांमधील आपल्या स्थानाला अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे.

 

कंपनीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे ग्राहक आहेत. राज्यातून कंपनीचे 30 ते 40 टक्के ग्राहक आहेत जे सरासरीत सर्वाधिक प्रमाण आहे. मुंबईतून सर्वाधिक ग्राहक असले तरी पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव आणि लातूर इथून सुद्धा ग्राहकांचे प्रमाण लाक्षणीय आहे. या केंद्रातून वर्ष ते वर्ष विचार करता 40% एवढी लक्षवेधक वृद्धी दिसून आली आहे.

 

विविध वित्तीय उत्पादनांसाठी कमीतकमी किंमतीला प्राधान्य देणाऱ्या डू इट युअरसेल्फ प्रकारातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवताना गुंतवणूक आणि विमा विषयक गरजांसाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणून कंपनीने स्वतःला समोर आणले आहे. रोबो अॅडव्हायजरी व्यासपीठ याच्यात असून त्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या सर्व वित्तीय गरजांचे निराकरण करता येते आणि म्युच्युअल फंड विकत घेण्यासाठी मदत ही मिळते. एखादी व्यक्ति विमाही (जीवन, आरोग्य आणि मोटर) या व्यासपिठाद्वारे खरेदी करू शकते.

 

कंपनी या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांपेक्षा ट्रेडिंग, गुंतवणूक आणि विमा उत्पादने सर्वात कमी दरात उपलब्ध करते. प्रत्येक ऑर्डरमागे रु.10 चे ब्रोकरेज घेतले जाते जे उद्योगात सर्वात कमी आहे. उद्योगातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 5पैसा आपल्या ग्राहकांना रिसर्च कॉल उपलब्ध करते आणि  इतर कोणतीही कंपनी अशी सुविधा देत नाही. याबरोबरच 5पैसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एखादी व्यक्ति ट्रेडिंग अकाऊंट फक्त 10 मिनिटात इ-केवायसी द्वारे उघडू शकते जी पूर्णपणे पेपरलेस आणि सोपी प्रक्रिया आहे.

 

टायर दोन आणि 3 शहरांच्या बाबत असलेल्या नियोजनाबाबत बोलताना भारताची वित्तीय उत्पादनांसाठी एकमेव मार्केटप्लेस असलेल्या 5पैसा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकर्ष गगडानीम्हणाले की “संपूर्ण उद्योगात म्युच्युअल फंड आणि विमा उत्पादनात सर्वात जास्त सूट देणारे आम्ही एकमेव आहोत. याबरोबरच आमची रोबो अॅडव्हायजरी सर्व्हीस आमच्या ग्राहकांना फार उपयुक्त आहे ज्यामुळे ते आपल्या वैयक्तिक निवडीवर ठाम रहाताना गुंतवणूक विषयक गरजांसाठी तंत्रज्ञानावर आधारित सल्ल्याचा लाभ घेऊ शकतात.”

 

5पैसा डॉट कॉम विविध मापदंडावर समाधानकारक प्रगती करत आहे जे तिच्या तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या व्यासपीठाने शक्य झाले आहे ज्यामुळे खर्च कमी रहातो आणि ग्राहकांना गुंतवणूक करताना चांगला अनुभव मिळतो. कंपनी लवकरच शेअर बाजारात स्वतंत्र कंपनी म्हणून नोंदली जाणार असून आयआयएफएलचा 1 शेअर असणाऱ्या समभागधारकाला 5पैसा कॅपिटल लिमिटेडचे 25 शेअर मिळणार आहेत.