‘परिवर्तनाचे दूत’ या चेंजमेकर्स स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वाची सुरूवात

WhatsApp-Image-2018-07-07-at-16.15.45.jpeg
Share this News:
पुणे :
खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी स्माईल संस्थेतर्फे चेंजमेकर्स (परिवर्तनाचे दूत) या स्पर्धेच्या माध्यमातून दोन उपक्रम यशस्वी केले. या दोन उपक्रमांनतर स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वाची सुरूवात झाली आहे.
या तिसर्‍या पर्वात सहा महिने 5 महिला कार्यकर्त्यांनी स्वत:च्या परिसरात 100 घरांमध्ये असणार्‍या प्रश्‍नांची नोंद करून त्यावर उत्तरे शोधायची आहेत. त्यातून परिवर्तन घडवून आणावयाचे आहे.
या स्फर्धेच्या माध्यमातून स्माईल संस्थेतर्फे महिलांना प्लास्टिक बंदीवर उत्तर म्हणून कागदी पिशव्या शिकवण्यात आल्या. प्रत्येक महिलेने कागदाच्या 5 पिशव्या तयार केल्या. यामुळे होणारे बदल लवकरच स्वच्छ, सुंदर पुणे व पर्यावरणपूरक वस्तूंचे पर्यायी वापर अशा गोष्टींमध्ये दिसून येतील. महिलांना शिकण्याची व शिकवण्याची संधी स्माईल ने या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना दिली आहे, असे स्माईल संस्थेच्या संस्थापक खा.वंदना चव्हाण म्हणाल्या.
या स्पर्धेचे तपशील नवी पेठ येथील स्माईल ऑफिस तसेच चेंजमेकर्स व स्माईलच्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती संजिवनी जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.