पर्यावरण जागृती-कृती प्रदर्शनाचे आयोजन

Exhibition.jpg
Share this News:

पुणे, दि. ९ जुलै: “वनराई” संस्थेच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमिलन आणि पर्यावरण जागृती-कृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १० जुलै २०१८ रोजी मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराईच्या कार्यालय आवारात हे पर्यावरण प्रदर्शनसायंकाळी ४:३० ते ८:३० यावेळेत असणार आहे. तर शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जागृती-कृती प्रदर्शन वेळ दुपारी १२:३०ते ४:३० आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं या हेतूने स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे दरवर्षी वर्धापन दिनी आयोजन करण्यात येते. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पहायला मिळणार आहे. प्रदर्शनात प्रामुख्याने विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती,पर्यावर व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचन साहित्य, मृदा-जल संवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपारिक ऊर्जा विभाग दालन असणार आहेत. याद्वारे नागरिकांना कृतीपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण होणार आहे.