पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Share this News:

पिंपरी दि 9 जुलै2018
पिंपरी-चिंचवड शहराकडे प्रदेश काँग्रेस दुर्लक्ष करत असल्यामुळे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (दि.8) पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला होता. साठे यांना पाठिंबा व्यक्त करीत आज सोमवारी सर्व पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिले आहेत. यामुळे शहर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे
राजीनामा देण्यात आलेल्यामध्ये महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, प्रदेश सदस्य संग्राम तावडे, प्रदेश एस.सी विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरगडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रूपनर, मावळ लोकसभा युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी विभागाचे किशोर कळसरकर, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णू नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, प्रदेश महिला काँग्रेस सचिव बिंदू तिवारी, एनएसयूआयचे अध्यक्ष विशाल कसबे, मयुर जैस्वाल, सज्जी वर्की या
पदाधिका-यांचा समावेश आहे.

शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर शहरातील कार्यकर्त्यांची व्यथा मांडली. त्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत आहोत. त्यामुळे आमच्यावर असलेल्या जबादारीतून मुक्त करुन आमचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच पक्षाच्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत पुढील काळात पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहू असे राजीनामा पत्रात म्हटले आहे.