पुणे – दौंड रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे काही गाड्या प्रभावित
पुणे मंडळाच्या वतीने पुणे – दौंड मधील रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम दिनांक 01.04.2018 पासून 22.04.2018 पर्यंत हाती घेण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील काळामध्ये या मार्गावरच्या काही गाड्यांमध्ये खालीलप्रमाणे बदल केले आहेत.
गाडी क्रमांक 71407 पुणे – दौंड डेमू पैसेंजर ( पुणे निघते 10.30 वाजता दौंड पोहोचते 12.35 वाजता ) आणि 71408 दौंड – पुणे डेमू पैसेंजर (दौंड निघते 12.43 वाजता पुणे पोहोचते 14.13 वाजता) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 51452 बारामती – पुणे पैसेंजर आणि गाडी क्रमांक 51421 पुणे – निझामाबाद पैसेंजर , पुणे-दौंड- पुणे या स्थानकां दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत
गाडी क्रमांक 11046 अमरावती – पुणे एक्सप्रेस मंगळवारी दौंड स्टेशनवर अंदाजे 50 मिनटे थांबेल.
गाडी क्रमांक 17014 हैद्राबाद – पुणे एक्सप्रेस ( सोमवार व बुधवारी) आणि गाडी क्रमांक 11046 अप अमरावती – पुणे एक्सप्रेस ( रविवारी) दौंड स्टेशनवर अंदाजे 1तास 50 मिनटांपर्यंत थांबेल.
गाडी क्रमांक 17014 हैद्राबाद – पुणे एक्सप्रेस ( शनिवारी) दौंड स्टेशन वर अंदाजे 1तास 15 मिनटे थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक 11078 जम्मूतावी – पुणे एक्सप्रेस ( बुधवार, शुक्रवार व रविवारी ) दौंड स्टेशन वर 10 मिनटाकरिता थांबवण्यात येईल.
रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या गैरसोयी करिता दिलगीरी व्यक्त करत आहे परंतू आपल्या सर्वांच्या सुरक्षित प्रवासा करता हे करणे गरजेचे असल्याने या काळात सहयोग करण्याचे अपील करत आहे.
